हेमंत चापुडे, झी मीडिया, पुणे : जगाच्या नकाशावर रांजणगाव चाकण एमआयडीसी ही औद्योगिक हब म्हणून नावारूपाला आलेली आहे. जागतिक पातळीवरील अनेक कंपन्या या एमआयडीसीमध्ये उभ्या राहिल्या. चांगला रोजगार नवीन तंत्रज्ञानातून विविध उत्पादने या एमआयडीसीत तयार होऊ लागला. मात्र आता या दोन्ही एमआयडीसी गुंडगिरी चोऱ्या दरोडे यांच्या विळख्यात सापडल्या आहेत. औद्योगिक हब म्हणून ओळखले जाणारे रांजणगाव चाकण एमआयडीसी एका वेगळ्या संकटात सापडली आहे.
शिरूर तालुक्यातील रांजणगाव व चाकण औद्योगिक नगरी खूप कमी कालावधीत जागतिक पातळीवरील अनेक कंपन्या या एमआयडीसी परिसरात उभ्या राहिल्या. या एमआयडीसीने अनेकांना रोजगार उपलब्ध करून दिला तर नवनवीन तंत्रज्ञानातून मोठ मोठे प्रकल्प उभे राहिले. मात्र या औद्योगिक नगरीमध्ये स्थानिक पातळीवरील गुंडगिरी तर दुसरीकडे चोरी दरोडे असे प्रकार दिवसेंदिवस वाढू लागले मात्र या सर्व संकटांवर नियंत्रण ठेवण्यासाठी उपाययोजना मात्र उभ्या राहिल्या नाहीत.
एमआयडीसीचे अनेक टप्पे उभे राहत एमआयडीसीचा विस्तार वाढला मात्र स्थानिकांना रोजगार मिळाला नाही.या एमआयडीसीमध्ये ठेकेदारी ठेकेदाराने स्थानिक राजकीय मंडळी उदयास आली. त्यातूनच अनेकांनी आपलं प्रस्थान या एमआयडीसीत स्थापित केलं आणि त्यातून गुंडगिरी दिवसेंदिवस वाढू लागली. एमआयडीसीसाठी स्वतंत्र पोलिस यंत्रणा देण्यात आली मात्र या एमआयडीसीत वाढणारी गुन्हेगारी मात्र कमी झालेली नाही. त्यामुळे कारखानदार मालक चिंतेत आला.
गेल्या काही दिवसांपासून रांजणगाव चाकण एमआयडीसी आर्थिक मंदीचा मोठ्या संकट उभे राहिल्यानंतर मोठ-मोठे उद्योग बंद पडण्याच्या मार्गावर लागले. मात्र या ठिकाणची ठेकेदारी ही वेगळ्याच मार्गाला गेले त्यातून कारखानदार मालक मालकांना कामगार संघटनांच्या माध्यमातून वेस्टीज धरण्यात आहे. त्यामुळे या परिसरातील कारखानदारी अधिकच अडचणीत आली मात्र यावर उपाय योजना करण्याची गरज असतानाही कारखानदारीच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे.
आर्थिक संकटात सापडलेले छोटे-मोठे उद्योग आता बंद पडण्याच्या मार्गावर आहे.तर दुसरीकडे याच एमआयडीसी परिसरात कारखानदारी मध्ये गुन्हेगारी चोरी दरोडे असे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहे. अशातच पोलिस यंत्रणाही आता सक्षम झाली असून पोलिसांनी अशा गुन्हेगारांवरती कठोरात कठोर कारवाई करण्यास सुरवात केली आहे..
जगाच्या नकाशावर औद्योगिक हब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या दोन्ही एमायडीसी पुढील काळात टिकवायची असतील तर या एमआयडीसीतील प्रस्थान ठेवलेले ठेकेदार आणि चोरी दरोड्याच्या घटना रोखण्यासाठी उपाययोजना करण्याची खरी गरज आहे.