स्टार खेळाडूच्या बायकोचा स्विमिंग पूलमधील हॉट लूक सगळ्याच अभिनेत्रींवर भारी, पाहा फोटो

सांचीने अंसल यूनिवर्सिटी च्या फॅकल्टी ऑफ सुशांत स्कूल ऑफ डिझाईनमधून आपले शिक्षण घेतले आहे.

Updated: Sep 23, 2021, 04:26 PM IST
स्टार खेळाडूच्या बायकोचा स्विमिंग पूलमधील हॉट लूक सगळ्याच अभिनेत्रींवर भारी, पाहा फोटो

मुंबई : क्रिकेट विश्वातील बहुतांश खेळाडूंनी आभिनय क्षेत्रातील किंवा मॉडलिंग क्षेत्रातील तरुणींशी लग्न केलं आहे किंवा त्यांची नावं जोडली जात आहेत. मात्र असे ही काही खेळाडू आहेत, ज्यांनी इतर क्षेत्रातील मुलींशी लग्न केलं आहे. सिनेसुष्टी किंवा चमचमत्या दुनियेसोबत संबंध नसला तरी काही क्रिकेटरने अशा तरुणींसोबत लग्न केलं आहे ज्या एखाद्या मॉडलपेक्षा ही कमी नाहीत.

नितीश राणा हे आयपीएल मधील खूप लोकप्रिय नाव आहे. नितीश राणा (Nitish Rana) हा कोलकाता नाईट रायडर्सचा एक मजबूत फलंदाज आहे, पण त्याची पत्नी सांची मारवाहही (Saachi Marwah) एखाद्या अभिनेत्रीपेक्षा कमी नाही.

कोलकाता नाईट रायडर्सचा फलंदाज नितीश राणा (Nitish Rana) आणि त्याची पत्नी सांची मारवाह यांची जोडी एकत्र खूप सुंदर दिसते.

नितीश राणची पत्नी सांची मारवाह (Saachi Marwah) व्यवसायाने इंटिरियर डिझायनर आहेत. नितीश आणि सांची यांचा विवाह फेब्रुवारी 2019 मध्ये झाला होता. नितीश त्याच्या खेळामुळे खूप प्रसिद्ध आहे, पण त्याची पत्नी सांची मारवाहबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे.

सांचीने अंसल यूनिवर्सिटी च्या फॅकल्टी ऑफ सुशांत स्कूल ऑफ डिझाईनमधून आपले शिक्षण घेतले आहे. सांचीने अनेक नामवंत इंटीरियर डिझायनर्सकडून प्रशिक्षणही घेतले आहे.

नितीश राणा आणि सांची मारवाह यांचा प्रेम विवाह झाला आहे. एका मुलाखतीत आपल्या लव्ह मॅरेज बद्द्ल सांगताना नितीशने सांगितले की, त्यांना लग्ना आधी साडेतीन वर्ष एकमेकांना डेट केलं. नितीश म्हणाला, " सांचीचा भाऊ परमवीर आणि माझा भाऊ एकमेकांना ओळखायचे ते फूटबॉल खेळाताना रोज भेटायचे तेव्हा मी देखील तेथे जायचो, तेव्हा मी सांची देखील तेथे यायाची. त्यानंतर मला समजले की, ती परमवीरची बहीण आहे."

त्यानंतर नितीश म्हणाला, सांची माझ्यापेक्षा दीड वर्षांनी मोठी आहे. परंतु मी त्याचा विचार न करतात तिच्याशी बोलायला लागलो आणि हळूहळू एकमेकांच्या जवळ यायाला लागलो. त्यानंतर आम्ही एकत्र राहण्याचा आणि लग्न करण्याचा निर्णय घेतला.

तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल, परंतु नितीश राणाला लग्न करण्याची खूप घाई होती. खरेतर सांची भेटण्यापूर्वी पासूनच नितीश ने ठरवलं होतं की, तो वयाच्या 24 ते 25 वर्षीपर्यंत लग्न करेल आणि तसे त्याने आपल्या कोचला देखील सांगितले होते.