नाना पटोले यांचा इशारा.. तर भाजप २ खासदारांचा पक्ष होईल

निवडणूक म्हटल्या की त्यात हार जीत असतेच. विजयाचा आनंद साजरा करा पण गर्व करू नका. इंदिराजी, वाजपेयीही निवडणूक हरले होते..  नाना पटोले यांनी सांगितली जुनी आठवण

Updated: Mar 11, 2022, 12:50 PM IST
नाना पटोले यांचा इशारा.. तर भाजप २ खासदारांचा पक्ष होईल title=

मुंबई : पाच राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत पंजाब राज्य वगळता उत्तर प्रदेश, उत्तराखंड,मणिपूर, मणिपूर आणि गोवा या चार राज्यात भाजपाला यश मिळाले. या विजयाचा भाजप प्रदेश कार्यालयासमोर जमून भाजप नेते, कार्यकर्ते यांनी आनंद साजरा केला. 

भाजप नेते यांनी यावेळी कार्यकर्त्यांसमोर बोलताना शिवसेनेवर टीका केली. राज्यात शिवसेनेचे दोन ही खासदार निवडून येणार नाही अशी टीका केली. 

यावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रतिक्रया व्यक्त करताना सांगितले की, भारतात लोकशाही आहे. इंदिरा गांधी ही निवडणुका हरल्या होत्या. अटल बिहारी वाजपेयी ही निवडणूका हरले होते. पण, विजयाचा आनंद साजरा करावा. गर्व करू नये.

राज्यात सुडाचे राजकारण सुरु आहे. भाजपमध्ये कुणीच भ्रष्टाचारी नाहीत का? नारायण राणे यांच्यावर देवेंद्र फडणवीस यांनी आरोप केले होते. आता राणेंचे काय झाले ? 

केंद्र सरकार महाराष्ट्राला निधी देत नाही. पण, सरकारवर कर्ज झाले तरी चालेल. त्याचा बोझा आम्ही लोकांवर बोझा पडू देणार नाही. महाविकास आघाडी सरकार पाच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करेल. सरकारला कुठलाही धोका नाही. पण, महाजन जसे म्हणतात तसे भाजपच्या केंद्र सरकारने सुडाचे राजकारण थांबविले नाही तर भाजप हा पूर्वीसारखा २ खासदारांचा पक्ष होण्यास वेळ लागणार नाही, अशी टीका त्यांनी केली.