जायकवाडीला पाणी सोडणार का? निर्णय पुढे ढकलला

पाण्यासाठी आणखी दोन दिवस वाट पाहावी लागणार

Updated: Oct 30, 2018, 09:01 AM IST
जायकवाडीला पाणी सोडणार का? निर्णय पुढे ढकलला title=

औरंगाबाद : राज्य सरकारनं जायकवाडी धरणात पाणी सोडण्याचा निर्णय दोन दिवस पुढे ढकललाय. त्यामुळे आता मराठवाड्यातील जनतेला पाण्यासाठी आणखी दोन दिवस वाट पाहावी लागणार आहे. पाणी सोडण्याच्या विरोधात पद्मश्री बाळासाहेब विखे पाटील साखर कारखान्यानं सर्वोच्च न्यायालयात याचिका केली होती. त्यावर सुनावणी घेत न्यायालयानं ३१ ऑक्टोबरला निर्णय देणार असल्याचं सांगितलं. 

जायकवाडी धरणात सोडण्यात येणाऱ्या पाण्याचा उपयोग मद्यनिमिर्तीसाठी होत असल्याची तक्रार यावेळी विखे पाटील कारखान्यानं केली. 

मात्र, तरीही न्यायालयानं पाणी सोडण्यास स्थगिती न देता दोन दिवसांनंतर सुनावणी ठेवली.

त्यामुळे गोदावरी महामंडळानं पाणी सोडण्याचा निर्णय दोन दिवसांनी पुढे ढकलल्याची माहिती नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दिलीय.