जळगाव : Jalgaon Bank Election : निवडणुकीआधीच भाजपला मोठा धक्का बसला आहे. जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत (Jalgaon District Bank Election) खासदार रक्षा खडसे (Raksha Khadse) यांचा उमेदवारी अर्ज छाननी दरम्यान बाद झाल्याने भाजपला जोरदार धक्का बसला आहे.
एकनाथ खडसे ( Eknath Khadse ) यांची कन्या रोहिणी खडसे (Rohini Khadse) विरूद्ध भाजप खासदार रक्षा खडसे यांच्यात लढत होणार होती. मात्र, रक्षा खडसे यांचा अर्जच बाद झाल्याने रोहिणी खडसे यांचा विजयाचा मार्ग एक हाती मोकळा झाल्याचे आता दिसू लागले आहे. तर एकनाथ खडसे ( Eknath Khadse) यांच्यासमोर असलेल्या दोन उमेदवारांचाही अर्ज बाद झाल्याने ते बिनविरोध निवडून येण्याचा मार्ग मोकळा झाल्याचे पाहायला मिळत आहे.
जळगाव जिल्हा बँकेच्या निवडणुकी साठी नुकतीच अर्ज भरण्याची प्रक्रिया पार पडली होती या प्रक्रिये नंतर आज अर्जांची छाननी करण्याचे काम सुरू झाले. यावेळी रक्षा खडसे यांचा उमेदवारी भरताना झालेल्या त्रुटी मुळे बाद झाल्याचे समोर आल्याने खळबळ उडाली आहे. रक्षा खडसे यांचा उमेदवारी अर्ज निवडणुकी पूर्वीच बाद झाल्याने भाजपसाठी हा मोठा धक्का मानले जात आहे तर रोहिणी खडसे विरूद्ध रक्षा खडसे यांच्यातील लढत होण्याची शक्यता मावळली असल्याने रोहिणी खडसे यांचा विजयाचा मार्ग मोकळा झाला आहे.
जळगाव जिल्हा बँकेची निवडणूक पुढील महिन्यात होऊ घातली आहे. या निवडणुकी पूर्वीच अनेक रंगतदार गोष्टी यामध्ये दिवसागणिक समोर येत असल्याने संपूर्ण राज्याचे लक्ष या निवडणुकीकडे लागले आहे. मागील काळात एकनाथ खडसे पालकमंत्री असताना त्यांनी सर्व पक्षीय पॅनल तयार करून ही निवडणूक लढविली होती. याचं पद्धतीने जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनीही ही निवडणूक सर्व पक्षीय लढविण्याचा प्रयत्न केला होता. मात्र शेवटच्या क्षणी काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षाने भाजपसोबत निवडणूक लढविण्यास नकार दिल्याने भाजप विरूद्ध महाविकास आघाडी अस चित्र निर्माण झाले होते. त्याचा परिणाम म्हणून मुक्ताईनगर मतदार संघातून खडसे विरूद्ध खडसे अशी लढत होण्याची शक्यता होती. मात्र, रक्षा खडसे यांचा अर्ज बाद झाल्याने ती शक्यता मावळली आहे.
रक्षा खडसे यांनी मुक्ताई नगर तालुक्यातील महिला राखीव आणि इतर मागास वर्गीय मधून दोन उमेदवारी अर्ज भरले होते. मात्र दोन्ही अर्ज हे छाननी दरम्यान बाद झाल्याने रक्षा खडसे यांचं जिल्हा बँक निवडणुकीमधून आव्हान संपुष्टात आल्याचे पाहायला मिळत आहे. रक्षा खडसे यांनी सुचका मार्फत आपले अर्ज भरले होते. नियमानुसार या अर्जावर सुचकाची सही आवश्यक असणे अनिवार्य असताना ही त्या अर्जावर नव्हती तर दुसऱ्या अर्जाचा विचार केला तर कोणत्याही सहकारी संस्थेचा दोन वर्ष सदस्य असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर एक वर्ष व्यवस्थापक असणे अनिवार्य असताना या तरतुदी रक्षा खडसे यांच्याकडून पूर्ण करण्यात आल्या नसल्याचं समोर आल्याने त्यांचा उमेदवारी अर्ज बाद झाला असल्याचे समोर आले आहे.
रक्षा खडसे यांच्या सोबतच भुसावळचे राष्ट्रवादी पक्षाचे माजी आमदार संतोष चौधरी यांचा देखील उमेदवारी अर्ज बाद झाल्याचे समोर आले आहे. संतोष चौधरी यांच्या उमेदवारी अर्जावर भाजप आमदार संजय सावकारे यांनी हरकत अर्ज दाखल करताना संतोष चौधरी यांना दोन वर्षांहून अधिक काळासाठी कारागृहाची शिक्षा न्यायालयाने ठोठावली असल्याची तक्रार केल्याने ती ग्राह्य धरण्यात आल्याने सावकारे यांचा उमेदवारी अर्ज ही बाद झाल्याने त्यांच्या समर्थकांना मोठा धक्का बसला आहे
मुक्ताईनगर विकासोसायटीमधून राष्ट्रवादी चे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी ही आपल्या सूचक मार्फत आपला उमेदवारी अर्ज भरला होता. त्यांच्या समोर असलेल्या दोन्ही उमेदवारांचे अर्जही तांत्रिक कारणानी बाद झाले असल्याने या निवडणुकीत एकनाथ खडसे यांचा ही बिनविरोधचा मार्ग मोकळा झाला असल्याचं पाहायला मिळत आहे.
|
IND
(20 ov) 167/8
|
VS |
AUS
119(18.2 ov)
|
| India beat Australia by 48 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
NEP
(50 ov) 239/9
|
VS |
UAE
243/6(49.1 ov)
|
| United Arab Emirates beat Nepal by 4 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
USA
(50 ov) 292/3
|
VS |
UAE
49(22.1 ov)
|
| USA beat United Arab Emirates by 243 runs | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.