वाल्मिक जोशी, झी 24 तास, जळगाव : भाजपचे ज्येष्ठ नेते गिरीश महाजन यांचा द्वितीय कन्येचा आज लग्न सोहळा पार पडत आहे. जळगावच्या जामनेर इथे हा विवाह सोहळा होत आहे. या सोहळ्याला अने दिग्गज नेते हजेरी लावत आहेत. भाजप नेते आणि माजी मंत्री गिरीश महाजन यांच्या द्वितीय कन्येचा विवाह जळगाव जिल्ह्यात त्यांच्या जामनेर मतदार संघात होत आहे.
हळदी समारंभाला अनेक दिग्गजांनी उपस्थिती दर्शवली होती. या सोहळ्याला केंद्रीय मंत्री आणि राज्यमंत्री हजेरी लावणार आहेत. 14 एकर जागेवर हा सोहळा पार पडणार आहे.
या विवाहासाठी राज्यातील दिग्गज नेते हजेरी लावणार आहेत. नितीन गडकरी, देवेंद्र फडणीस, नारायण राणे, रावसाहेब दानवे, भागवत कराड,रामदास आठवले, अशोक चाव्हन, एकनाथ शिंदे,अब्दुल सत्तार,गुलाबराव पाटील,कपिल पाटील,भारती पवार उपस्थित राहणार आहेत.
कोण आहे गिरीश महाजन यांचे जावई?
अक्षय अजय गुजर हे गिरीश महाजन यांचे होणारे जावई आहेत. मूळचे जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील चहारडी गावातील मूळचे रहिवासी आहेत. आयटी इंजिनिअरिंगमध्ये शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी पुण्यात फूड इंडस्ट्रीमध्ये काम सुरू केलं. त्यांचे वडील अजय गुजर हे शेती आणि बांधकाम व्यावसायिक आहेत. पुण्यात त्यांचा बांधकाम व्यवसाय आहे.
हळदीचा समारंभ अगदी साध्या पद्धतीनं पार पडला. यावेळी गिरीश महाजन आपल्या मुलीला हळद लावताना दिसले. आज त्यांच्या द्वितीय कन्येचा शाही विवाह सोहळा होत आहे.