धक्कादायक! जळगावात परिचारिकांचे वॉर्डमध्येच नृत्य

नवजातशिशु उपचार कक्षातील वॉर्ड क्रमांक चारमध्ये चक्क नाच-गाण्याचा कार्यक्रम परिचारिकांकडून आयोजित करण्यात आला होता.

Updated: Jan 21, 2019, 04:52 PM IST
धक्कादायक! जळगावात परिचारिकांचे वॉर्डमध्येच नृत्य title=

जळगाव - जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. येथील शिशु विभागातल्या परिचारिका चक्क वॉर्डमध्येच नृत्य करत असल्याचा एक व्हिडिओ पुढे आला आहे. नवजातशिशु उपचार कक्षातील वॉर्ड क्रमांक चारमध्ये चक्क नाच-गाण्याचा कार्यक्रम परिचारिकांकडून आयोजित करण्यात आला होता. 

हा कार्यक्रम कधी झाला ? त्यामागचा उद्देश काय होता, याबाबत ठोस कारण समोर आलेले नाही. परंतु, रुग्णालय जवळ असेल, तरीही ध्वनिक्षेपकाचा आवाज बंद करण्याच्या सूचना लावलेल्या असतात. असे असताना या परिचारिकांचा रुग्णालयातच काम सोडून चक्क नाच गाण्याचा कार्यक्रम कसा काय करत होत्या, असा प्रश्न उपस्थित करण्यात येतो आहे. या प्रकरणाची लवकरात लवकर चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात येत आहे. 

वॉर्डमध्ये लहान मुलं उपचारासाठी आलेली असताना या परिचारिका नृत्य करण्यात दंग असल्याचे पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले. काही महिन्यांपूर्वी मुंबईमधील सरकारी कार्यालयात अशाच प्रकारे काही महिला नृत्य करत असल्याचा व्हिडिओ पुढे आला होता.