जालन्यात कारमधून गावठी पिस्टलसह तलवार जप्त

गावठी पिस्टलासह तलवार घेऊन जाणाऱ्या संशयितास अटक करण्यात आली आहे.

Updated: Jun 4, 2019, 05:19 PM IST
जालन्यात कारमधून गावठी पिस्टलसह तलवार जप्त title=

नितेश महाजन, झी मीडिया, जालना : महागड्या कारमधून गावठी पिस्टलासह तलवार घेऊन जाणाऱ्या संशयितास अटक करण्यात आली आहे. जालना येथून हा प्रकार समोर आला असून पोलिसांच्या रणनितीला यश आले आहे. पोलीस या संशयिताच्या मागावर होते अखेर नुकताच तो पोलिसांच्या तावडीत सापडला आहे. दिलीप डोंगरे असे या आरोपीचे नाव असून त्याला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. पोलीस याप्रकरणी अधिक चौकशी करत आहेत. दिलीप याचे गुन्हेगारी जगताशी संबंध आहेत का ? कोणत्या बड्या हस्तीच्या सांगण्यावर तो पिस्टल आणि तलवार बाळगत होता का ? याची चौकशी केली जात आहे. 

दिलीप डोंगरे या इसम गावठी पिस्टलसह तलवार घेऊन प्रवास करत होता.  नेणाऱ्य जालन्याच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. या कारवाईत पोलिसांनी गावठी पिस्टलासह तलवार जप्त केली आहे. काल मध्यरात्री शहरातील चंदनझीरा परिसरातील सुंदर नगर भागात पोलिसांनी ही कारवाई केली.

दिलीप डोंगरे हा वॅगन कंपनीच्या कारमधून एक गावठी पिस्टल आणि तलवार घेऊन जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.या माहितीवरून सापळा रचून पोलिसांनी गावठी पिस्टलसह तलवार आणि महागडी कार जप्त करत आरोपीला जेरबंद केले आहे. याप्रकरणी आरोपी विरोधात चंदनझीरा पोलिसात गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरु आहे.