महाराष्ट्र-कर्नाटकचा सीमावाद थेट मस्कच्या दारी, जयंत पाटलांची ट्विटरच्या मालकाला गळ!

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी एक ट्वीट केलंय. त्यात थेट ट्विटरचे मालक एलॉन मस्क यांनाच टॅग करुन प्रश्न विचारलाय.

Updated: Dec 19, 2022, 05:43 PM IST
महाराष्ट्र-कर्नाटकचा सीमावाद थेट मस्कच्या दारी, जयंत पाटलांची ट्विटरच्या मालकाला गळ! title=

Jayanat Patil tweet  Elon Musk : एलॉन मस्क यांनी (Elon Musk) ट्विटरच्या अध्यक्षपदाची सूत्रे हातात घेतल्यावर अनेक वादग्रस्त निर्णय घेतले. यामध्ये अनेक पत्रकारांचे ट्विटर अकाऊंट हे बंद करण्यात आले होते. एलॉन मस्क यांनी अध्यक्षपदावरून पायउतार होण्याबाबत एक पोल घेतला आहे. जो पोल येईल तोच निर्णय घेणार असल्याचं सांगितलं आहे. याचाच धागा पकडत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी महाराष्ट्र आणि  कर्नाटकमधील बेळगाव सीमावादातील ट्विटबद्दल मस्क यांना खुलासा करायला लावला आहे. (Jayanat Patil tweet and ask Elon Musk Karnataka Maharashtra marginalism latets marathi news)

कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्या ट्विटची सत्यता कळावी यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी एक ट्वीट केलंय. त्यात थेट ट्विटरचे मालक एलॉन मस्क यांनाच टॅग करुन प्रश्न विचारलाय. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी केलेले ट्विट त्यांनी केलेले नाही, असे कर्नाटक आणि महाराष्ट्र दोन्ही राज्यांचे मुख्यमंत्री सांगताहेत. त्यामुळं एलॉन मस्क यांनीच आता सांगावं की हे ट्विट नक्की कोणी केलं. 

कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मईंच्या ट्विटवरुन विरोधकांनी अधिवेशनामध्ये सरकारला घेरलं. विधानसभेचं कामकाज सुरु होताच विरोधी पक्षनेते अजित पवारांनी सीमावादावरुन आक्रमक भूमिका घेत बोम्मईंच्या ट्विटवर सवाल विचारला. तेव्हा बोम्मईंच्या नावाने खोटं ट्विट कोणी केलंय. खोटं ट्विट करण्यामागे कोणता पक्ष आहे ते कळलंय अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सभागृहात दिली. ही ट्विटस आपण केली नसल्याचं बोम्मईंनी दिल्लीच्या बैठकीत सांगितलं याचा पुनरुच्चारही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केला.

दरम्यान, दोन्ही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की ते ट्विट बोम्मईंनी केलं नाही. यावर एलॉन मस्क काय प्रतिक्रिया देतात की नाही हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.