Winter Session: 'तुम्हाला मंत्री व्हायचं का? बोला...'; भर सभागृहात ठाकरेंच्या आमदाराला फडणवीसांची खुली ऑफर!

Devendra fadanvis offer to mla sunil prabhu: कर्नाटक सरकारचा धिक्कार असो, अशा घोषणा देत विरोधकांनी पहिल्याच दिवशी रान पेटवलं. त्यामुळे आता नऊ दिवसांचं अधिवेशन वादळी (Winter Session Nagpur) ठरणार हे नक्की. अधिवेशनात सीमावादाचा प्रश्न सुरू असताना...

Updated: Dec 19, 2022, 04:40 PM IST
Winter Session: 'तुम्हाला मंत्री व्हायचं का? बोला...'; भर सभागृहात ठाकरेंच्या आमदाराला फडणवीसांची खुली ऑफर!  title=
Devendra fadanvis ,sunil prabhu

Maharashtra Assembly Winter Session 2022 : नागपूरमध्ये सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनाच्या (Winter Session) पहिल्या दिवशी विरोधकांनी विविध मुद्दे उपस्थित करत सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमाप्रश्नावर (Maharashtra Karnataka Border Dispute) महाविकास आघाडीने सरकारवर आक्रमक टीका केली. त्यावेळी विरोधकांना डिफेन्ड करण्यासाठी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) मैदानात उतरले. ठाकरे गटाचे आमदार सुनील प्रभू (MLA Sunil Prabhu) यांनी प्रश्नांची सरबत्ती करत सरकारवर निशाण्यावर घेण्याचा प्रयत्न केला. (Devendra fadanvis offer to mla sunil prabhu to become minister in Maharashtra Assembly Winter Session 2022 marathi news)

कर्नाटक सरकारचा धिक्कार असो, अशा घोषणा देत विरोधकांनी पहिल्याच दिवशी रान पेटवलं. त्यामुळे आता नऊ दिवसांचं अधिवेशन वादळी (Winter Session Nagpur) ठरणार हे नक्की. अधिवेशनात सीमावादाचा प्रश्न सुरू असताना देवेंद्र फडणवीस आणि विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांच्यात खडाजंगी रंगली. त्यानंतर सुनिल प्रभू यांनी मोर्चा सांभाळला. सुनील प्रभू यांनी हरकतीचा मुद्दा उपस्थित केला.

सरकारमध्ये एकही राज्यमंत्री नसताना देखील नागपूर अधिवेशनात राज्यमंत्र्यांचे सरकारे बंगले सजवले जात आहेत. शासन कर्ज काढत असताना ज्या बंगल्याची आवश्यकताच नाही, त्यावर शासनाने खर्च करण्याची आवश्यकता आहे का?, असा प्रश्न प्रभू  (Sunil Prabhu) यांनी उपस्थित करून सरकारला धारेवर धरण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्याला फडणवीसांनी प्रत्युत्तर दिलं.

आणखी वाचा - "अमित शाह यांच्यासमोर ठरलेलं असताना..."; बेळगावात जाण्यास बंदी घातल्याने भडकले अजित पवार

दरम्यान, आम्ही अधिवेशन सुरू असताना मंत्रीमंडळ विस्तार करू शकतो. तसेच प्रत्येक अधिवेशनात रंगरंगोटी होतच असते. त्याला खर्च जास्त होत नाही. वाटलं तर हिशोब पाठवतो, असं म्हणत फडणवीसांनी प्रभूंचा हिशोब केला. त्यानंतर प्रभूंनी मधेच उभं राहत लवकर मंत्रीमंडळाचा विस्तार (Expansion of the Cabinet) करा, असा सल्ला प्रभूंनी फडणवीसांनी दिला. त्यावेळी तुम्हाला मंत्री व्हायचं का? बोला..., असं म्हणत त्यांनी सुनिल प्रभू यांना थेट ऑफरच दिल्याचं पहायला मिळालं.