Jayant Patil: राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात जोरदार इनकमिंग सुरु आहे.. अनेक जण तुतारी हाती घेत आहेत.. तर तुतारी हाती घेऊ इच्छिणा-यांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. मात्र याचवेळी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षातून मोठी घडामोड समोर येतेय. कारण पक्षाचे खासदार अमोल कोल्हेंनी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याबाबत मोठं विधान केलंय.. जयंत पाटील हे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मात्र याच जयंत पाटील यांच्याबाबत त्यांच्याच पक्षाचे खासदार अमोल कोल्हेंनी मोठं विधान केलंय.राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येईल आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधलं सर्वोच्च पद जयंत पाटील यांनाच असेल असं विधान अमोल कोल्हेंनी केलंय. त्यामुळे आता राजकीय चर्चांना उधाण आलंय.
जयंत पाटील हे सध्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत.1999 ते 2008 या काळात जयंत पाटील महाराष्ट्राचे अर्थमंत्री राहिले आहेत. 2008 ते 2009 या काळात जयंत पाटी महाराष्ट्राचे गृहमंत्री राहिले आहेत. त्यानंतर 2009 ते 2014 या काळात जयंत पाटील महाराष्ट्राचे ग्रामविकास मंत्री होते. तर उद्धव ठाकरेंच्या काळात जयंत पाटील जलसंपदा मंत्री होतेराज्याचा सर्वाधिक वेळा अर्थसंकल्प मांडण्याचा विक्रम जयंत पाटील यांच्या नावावर आहे. विधानसभेत 1990 पासून इस्लामपूर मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतायत.
राष्ट्रवादीमध्ये शरद पवार अध्यक्ष आहेत. त्यांची लेक सुप्रिया सुळे खासदार आहेत तर नातू रोहित पवार आमदार आहेत.. दोन महिने रोहित पवारांना सांभाळा...आता रोहित पवारांना महाराष्ट्र सांभाळायचा आहे असं विधान शरद पवारांनी नुकतंच केलं होतं. त्यामुळे रोहित पवार वारसदार असतील अशाही चर्चा सुरु झाल्या होत्या. तर त्याआधी रोहित पवार आणि जयंत पाटील यांच्यातही वादही चव्हाट्यावर आला होता.. एकीकडे रोहित पवारांनी जयंत पाटलांबाबत वाद नसल्याचं स्पष्टीकरण दिलंय. तर दुसरीकडे हर्षवर्धन पाटील यांनी शरद पवारांना बिग बॉस म्हटलंय.मात्र आता जयंत पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेसमधलं सर्वोच्च पद मिळणार म्हणजे नेमकं कोणतं पद मिळणार याची उत्सुकता सर्वांनाच लागलीय.
"प्रवीण सुरेश दाभोळकर हे 'झी 24 तास' डिजिटलमध्ये चीफ सब एडीटर पदावर कार्यरत आहेत त्यांना मीडिया क्षेत्राचा 14 वर्षांचा अनुभव आहे. वयाच्या 21 व्या वर्षी त्यांनी प्रिंट मीडियातून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. तिथे त्यांना लेखन आणि रिपोर्टिंगचा मौल्यवान अनुभव मिळाला. तेव्हापासून त्यांनी प्रिंट, टीव्ही आणि डिजिटल मीडियासह विविध माध्यमांमध्ये काम केले आहे. संशोधनात्मक अहवाल आणि फिचर रायटिंगकडे त्यांचा कल आहे. वाचकांना माहिती नसलेल्या कथा लोकांसमोर आणण्याची त्यांना आवड आहे. हे करीत असताना सविस्तर तपशील आणि अचूकतेकडे त्यांची कटाक्षाने नजर असते. फावल्या वेळात प्रविण आपल्या आनंदासाठी फिरणे, नवीन गोष्टी आत्मसात करणे आणि सामाजिक कार्यात गुंतलेले असतात. त्यांचे लेखन अनेकदा सामाजिक न्यायाच्या समस्यांबद्दलची त्यांची उत्कटता दर्शवते. तसेच आपल्या लेखणीच्या माध्यमातून समाजात सकारात्मक प्रभाव पाडण्यासाठी ते नेहमी प्रयत्नशील असतात."
...Read More|
NZ
|
VS |
IND
|
| New Zealand beat India by 41 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
NZ
|
VS |
IND
|
| New Zealand beat India by 7 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
NZ
|
VS |
IND
|
| India beat New Zealand by 4 wickets | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.