Bullet Train in India: भारतातील सर्वात मोठा प्रोजेक्ट आपल्या महाराष्ट्रात बनत आहे. बुलेट ट्रेनच्या मार्गाच्या कामाला वेग आला आहे. या मार्गावर अरबी समुद्रा खालून जाणारा देशातला पहिला 21 किलोमीटर लांबीचा बोगदा तयार करण्यात येणार आहे. त्यातून तब्बल ताशी 320 किमीच्या वेगाने बुलेट ट्रेन धावणार आहे. ठाण्याच्या खाडीत याचे खोदकाम सुरु झाले आहे.
मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेन कॉरिडॉर तयार करण्याचे काम वेगाने सुरू आहे. नॅशनल हाय स्पीड रेल्वे कॉर्पोरेशनच्या माध्यमातून बुलेट ट्रेनच्या प्रोजेक्टचे काम केले जात आहे. 508 कि.मी. लांबीचा हा मुंबई ते अहमदाबाद असा बुलेट ट्रेनचा कॉरीडॉर आहे. त्यापैकी 2 किलोमीटरचा मार्ग जमिनीखालून जाणार आहे. हा बोगदा देशातील पहिलाच समुद्राखालून निघणारा बोगदा आहे.
या बोगद्याची खोली जमिनीखाली 25 ते 65 मीटर इतकी असेल.असून बोगद्याचे खोदकाम तीन महाकाय मशीनच्या मदतीने करण्यात येत आहे. हा बोगदाच मुंबईत-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाचा हा महत्त्वाचा भाग असणार आहे. बोगदा बीकेसी आणि शिळफाट स्थानकांदरम्यान असणार आहे. 21 किमीच्या बोगद्याचं लवकर काम सुरू झाले आहे. ठाण्यात 7 किमी बोगदा खोदला जात आहे. हा बोगदा तयार करण्यासाठी टनेल बोअरिंग मशीन आणि न्यू ऑस्ट्रियन टनेलिंग मेथड यांचा वापर केला जात आहे.
Dive deep into the progress of the 21 km-long tunnel for the #BulletTrain project.
So far, more than 200 meters of the tunnel have been excavated from the Shilphata end using NATM technology.
Video Credits: @nhsrcl pic.twitter.com/mMj8aYotuE
— Western Railway (@WesternRly) October 7, 2024
मुंबई एचएसआर स्थानकाच्या बांधकामस्थळी सेकेंट पायलिंगचे 100% टक्के काम पूर्ण झाले असून उर्वरित खोदकाम सुरू आहे. विक्रोळी, घणसोलीजवळील सावली येथे या वर्षाच्या अखेरीस येथे पहिले टनेल बोअरिंग मशीन खाली जमिनीत टाकण्यासाठी उपलब्ध होणार आहे. शिळफाटा येथे आतापर्यंत 200 मीटर खोदकाम पूर्ण झाले आहे.
मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन मार्गिकेवर एकूण 12 स्टेशन असणार आहेत. यामुळे मुंबईहून अहमदाबाद प्रवास फक्त 3 तासांत पूर्ण होणार आहे. 12 स्थानकांपैकी 4 स्थानके महाराष्ट्रात असणार आहेत. तर, 8 स्थानके गुजरातमध्ये असतील. यात मुंबईतील वांद्रे कुर्ला कॉम्पलेक्स (BKC), ठाणे, विरार, बोईसर, वापी, बिलिमोरा, सूरत, भरुच, वडोदरा, आणंद, अहमदाबाद आणि साबरमती या स्थानकांचा समावेश आहे. ऑगस्ट 2026पासून बुलेट ट्रेनच्या चाचण्या सुरू होण्याची शक्यता आहे.
जवळपास 3681 कोटींचा हा बुलेट ट्रेन प्रकल्प आहे. या प्रकल्पासाठी 559 कर्मचारी 24 तास काम करत आहेत.या प्रकल्पासाठी 24 पुल नदीवर बांधण्यात येणार आहेत. त्यातील 20 पूल गुजरातमध्ये आणि 4 पूल महाराष्ट्रात आहेत. तर, बुलेट ट्रेन 320 किमी प्रति तास धावणार आहे. मुंबई-अहमदाबाददरम्यानचे अंतर फक्त 127 मिनिटांत पूर्ण करणार आहे.