Maharastra Politics : 'माझ्या तोंडाला लागू नका, बापाशी गद्दारी...', मोठा खुलासा करत आव्हाडांचं मुश्रीफांना प्रत्युत्तर!

NCP Crisis In Maharastra : हसन मुश्रिफांच्या आरोपावर, आपण त्या पत्रावर जरी स्वाक्षरी केली असली तरी भाजपसोबत जाणं अमान्य होतं, असा दावा आव्हाडांनी केलाय. नेमकं काय काय म्हणाले आव्हाड पाहा...

सौरभ तळेकर | Updated: Dec 23, 2023, 08:27 PM IST
Maharastra Politics : 'माझ्या तोंडाला लागू नका, बापाशी गद्दारी...', मोठा खुलासा करत आव्हाडांचं मुश्रीफांना प्रत्युत्तर! title=
jitendra awhad reply hasan mushrif

Jitendra Awhad On Hasan Mushrif : भाजपसोबत जाण्यावरून हसन मुश्रीफ आणि जितेंद्र आव्हाड यांच्यात चांगलीच जुंपलीय. भाजपसोबत जाण्यासाठी जितेंद्र आव्हाडांनीच पुढाकार घेतला होता. असा दावा हसन मुश्रीफांनी केलाय. एकाकी पडल्यानं आव्हाड भ्रमिष्ट झाले आहेत अशी टीकाही मुश्रीफांनी केलीय. इतकंच नाही तर सगळं काही यालाच कळतं का? असा एकेरी उल्लेख करत मुश्रीफांनी आव्हाडांवर निशाणा साधलाय. तर आपण त्या पत्रावर जरी स्वाक्षरी केली असली तरी भाजपसोबत जाणं अमान्य होतं, असा दावा आव्हाडांनी केलाय. नेमकं काय काय म्हणाले आव्हाड पाहा...

काय म्हणाले Jitendra Awhad?

मी माझ्या राजकीय जीवनात हसन मुश्रीफांना 5 मिनिटांपेक्षा अधिक मी बोललो नाही. 2019 साली शरद पवारांच्या पुण्यातील घरी बैठक झाली होती. त्या बैठकीला सर्व प्रमुख नेते उपस्थित होते. तेव्हा हसन मुश्रीफांनी भाजपाबरोबर जाऊ नये म्हणून टोकाचा विरोध केला होता, असा खुलासा आव्हाडांनी केला आहे. शरद पवारांना पत्र लिहित भाजपाबरोबर जाण्यासाठी विनंती करू, असं ठरलं होतं. त्यावेळी मी पत्रावर सही केली होती. पण जयंत पाटलांनी शरद पवारांना पत्र दिलंच नाही, असं आव्हाड म्हणाले आहेत.

माझ्याकडे आजही ते पत्र आहे. मात्र नंतर भाजपसोबत जाण्यासाठी सतत आग्रह करणाऱ्या नेत्यांमध्ये हसन मुश्रीफ होते, असंही आव्हाड म्हणतात. मी माझ्या बापाशी गद्दारी केली नाही. सदाशिवराव मंडलिक यांनी तुम्हाला कुठं पोहचावलं हे सगळ्या कोल्हापुरला माहिती आहे. मी तुमच्या नादाला लागलो नाही. माझ्या तोंडाला लागू नका, असं म्हणत आव्हाडांनी थेट इशारा दिला आहे.

एकनाथ शिंदे गुवाहाटीला गेल्यानंतर भाजपाबरोबर सत्तेत जाण्यासाठी जितेंद्र आव्हाड यांनी पुढाकार घेतला होता. 53 आमदारांमध्ये सर्वात पहिली सही जितेंद्र आव्हाडांची होती, असा दावा हसन मुश्रीफ यांनी केला होता. त्यावर आता जितेंद्र आव्हाडांनी प्रत्युत्तर दिलं आहे. त्यामुळे आता या दोन्ही नेत्यांचा वाद आणखी किती पेटणार? हे पाहणं औत्युक्याचं ठरणार आहे.

दरम्यान, फुले शाहू आंबेडकर एका मांडीवर आणि गुळवरकर त्यांच्या एका मांडीवर आहेत. एकदा लढाई करायचे ठरवली तर पुढे जो निर्णय होईल तो होईल.  सोमवारी सुनिल केदार उच्च न्यायालयात जातील त्यावर उच्च न्यायालय स्थगिती देईल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.