भगवत गीता तोंडपाठ आहे म्हणणाऱ्या आव्हाडांना फुशारकी नडली

आव्हाडांनी भाषणबाजीच्या नादात गीतेतील एका श्लोकाच्या दोन ओळी म्हटल्या. 

Updated: Jul 12, 2018, 08:03 PM IST
भगवत गीता तोंडपाठ आहे म्हणणाऱ्या आव्हाडांना फुशारकी नडली

नागपूर: भगवत गीतेच्या सक्तीच्या मुद्दयावरून गुरुवारी विधानसभेत मोठे 'रामायण' पाहायला मिळाले. हा सर्व धुरळा खाली बसतो ना तोच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते यांनी जितेंद्र आव्हाड यांनी फुशारकी मारण्याच्या नादात स्वत:चे चांगलेच हसे करुन घेतले. विधिमंडळातून बाहेर पडल्यानंतर जितेंद्र आव्हाड प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी आव्हाडांनी बोलण्याच्या नादात आपल्याला भगवत गीता मुखोद्गत असल्याचे सांगितले. मग प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनीही नेमका हाच शब्द पकडत जितेंद्र आव्हाड यांना गीतेमधील श्लोक म्हणायला लावले. तेव्हा मात्र, आव्हाडांची चांगलीच तारांबळ उडाली. 

आव्हाडांनी भाषणबाजीच्या नादात गीतेतील एका श्लोकाच्या दोन ओळी म्हटल्या. त्यानंतर आव्हाडांनी पुन्हा बोलायला सुरुवात केली. तेव्हा एका पत्रकाराने आणखी काही श्लोक म्हणून दाखवा, असे म्हटले. तेव्हा आव्हाडांचा पारा चढला. तुम्ही भाजपाचे प्रतिनिधी आहात का?  मला गीता तोंडपाठ आहे, ज्यांना ऐकायची असेल त्यांनी बाजूला या, असा हेका आव्हाडांनी शेवटपर्यंत कायम ठेवला.