सांगली : कोरोनाचा फैलाव होत असल्याने लॉकडाऊन आणि संचारबंदी लागू करण्यात आली आहे. मात्र, याचे उल्लंघन होताना दिसून येत आहे. लॉकडाऊनमध्ये अत्यावश्यक सेवा सुरु आहे. या अत्यावश्यक सेवेचा लाभ गैरमार्गाने घेतला जात असल्याची बाब आता हळूहळू पुढे येत आहे. या सेवेचा गैरउपयोग करुन मुंबईहून सांगलीत आलेल्या तरुणीला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. तसेच ज्या वाहनातून तीने प्रवास केल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, संचारबंदी आणि लॉकडाऊनचे उल्लंघन केल्याप्रकणी पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात बहीण आणि भावाचाही समावेश आहे.
BreakingNews । सांगली । अत्यावश्यक सेवेचा गैरवापर करून मुंबईतून आणलेल्या मुलीला कोरोनाची लागण । शिराळा तालुक्यातील निगडी खुर्द येथील त्या कोरोनाग्रस्त तरुणीला आणि तिच्या भावाला मुंबईहून आणणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल#Coronavirus #Lockdown #COVID19
@rajeshtope11@ashish_jadhao— ZEE २४ तास (@zee24taasnews) April 25, 2020
मुंबईतून आपल्या बहिणीला आणण्यासाठी भावाने अत्यावश्यक सेवेचा गैरउपयोग केला. याप्रकरणी शिराळा तालुक्यातील निगडी खुर्द येथील त्या कोरोनाग्रस्त तरुणीला आणि तिच्या भावाला मुंबईहून आणणाऱ्यांविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कॅन्सरग्रस्त रुग्णाला उपचारासाठी मुंबईला नेण्यासाठी ऑनलाइन अत्यावश्यक सेवेचा पास वाहन चालकाने काढला होता. त्यानंतर मुंबईत रुग्णाला रुग्णालयात दाखल करुन गावी परतत असताना त्यांनी गावतील एक मुलगा आणि मुलीला मुंबईतून आणले. हे दोघे बहीण-भाऊ होते. नियमाचे उल्लंघन केल्याप्रकरणी २३ वर्षीय कोरोना ग्रस्त तरुणीसह पाच जणांवर शिराळा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्यावर आपत्ती व्यवस्थापन कायदा, संचारबंदी भंग सह अन्य गुन्हे दाखल केले आहेत.
कॅन्सरग्रस्त महिलेला उपचारासाठी मुंबईला नेण्यासाठी प्रदीप पाटील यांने ऑनलाइन जिल्हा पोलीस प्रमुखांच्या परवानगीचा पास काढला होता. गणपती भालेकर, प्रदीप पाटील, रामचंद्र भालेकर यांच्यासह मुंबईतून आलेल्या भाऊ आणि कोरोना पॉझिटिव्ह बहिणीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, या कुटुंबातील सात जणांना क्वारंटाईन करण्यात आले असून, चार जणांना इन्स्टिट्युशनल क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आले आहे.