कल्याण रेल्वे स्थानकावर बॅगेत मृतदेह, गूढ उकलले

टिटवाळ्यातल्या प्रिन्सी तिवारीची हत्या करुन तिचं धड कल्याण खाडीत फेकून दिल्याचं पोलीस तपासात स्पष्ट झालंय.

Updated: Dec 11, 2019, 12:08 AM IST
कल्याण रेल्वे स्थानकावर बॅगेत मृतदेह, गूढ उकलले

कल्याण : टिटवाळ्यातल्या प्रिन्सी तिवारीची हत्या करुन तिचं धड कल्याण खाडीत फेकून दिल्याचं पोलीस तपासात स्पष्ट झालंय. प्रेमसंबंधातील विरोधातून अरविंद तिवारीनं प्रिन्सीची हत्या केली. अरविंद तिवारीनं तिच्या मृतदेहाचे तुकडे करुन धड कल्याण खाडीत फेकल्याचं सांगितलं. पोलिसांनी कल्याणच्या खाडीत शोध घ्यायला सुरुवात केलीय. अंधार झाल्यानं शोधकार्य बंद केलं आहे पुन्हा उद्या शोधकार्य सुरु करण्यात येणार आहे.

कल्याण रेल्वे स्थानक स्टेशन परिसरात 8 डिसेंबर 2019 रोजी एक धक्कादायक घटना घडली होती, कारण या परिसरात एका बॅगमध्ये महिलेचा मृतदेह आढळून आला होता. या मृतदेहाचं धड गायब असल्याने, परिसरात एकच खळबळ माजली आहे. दरम्यान, बॅग ठेवून जाणारा आरोपी सीसीटीव्हीमध्ये कैद झाला होता.