मुंबई : मुंबई गोवा महामार्गाचं चौपदरीकरण होत आहे. यामुळे अनेक झाडं तोडण्यात आली आहे. अशाच कोकणच्या अनेक आठवणी लुप्त होता आहेत. कणकवलीतील सुमारे दीडशे वर्ष जुना असलेला वटवृक्ष या चौपदरीकरणात तोडला जाणार आहे. पण कणकवलीकरांनी या वटवृक्षाला आगळ्या पद्धतीने निरोप दिला.
या वटवृक्षाशी कणकवलीकरांच्या अनेक आठवणी जोडल्या गेल्या आहेत. दीडशे वर्ष जुन्या असलेल्या या झाडाने कणकवलीचा विकास पाहिला आहे. त्यामुळे या झाडाला निरोप देण्यासाठी कणकवलीकरांनी या झाडाची कृतज्ञता व्यक्त केली. गाऱ्हाणं घालून त्यांनी झाडाला निरोप दिला.
या महामार्गाच्या चौपदीकरणाचे काम मे 2019 पर्यंत पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या महामार्गाचे काम जोरात सुरू आहेत. खेडपर्यंत या महामार्गाचे काम पूर्ण होत आल्याचे म्हटले आहे.