पद्मावत विरोध : बेळगावात थिएटर बाहेर फेकले पेट्रोल बॉम्ब

निर्माता संजय लिला भन्साळीचा 'पद्मावत' सिनेमा खूप वादानंतर २५ जानेवारीला प्रदर्शित झाला. पण अजूनही याला होणारा विरोध मावळताना दिसत नाहीए. काही ठिकाणी सिनेमाचै कौतूक केले जात आहे तर राजपूत संघटना कडवा विरोध करतेय.

Pravin.Dabholkar Pravin Dabholkar | Updated: Jan 27, 2018, 09:55 AM IST
पद्मावत विरोध : बेळगावात थिएटर बाहेर फेकले पेट्रोल बॉम्ब  title=

बेळगाव : निर्माता संजय लिला भन्साळीचा 'पद्मावत' सिनेमा खूप वादानंतर २५ जानेवारीला प्रदर्शित झाला. पण अजूनही याला होणारा विरोध मावळताना दिसत नाहीए. काही ठिकाणी सिनेमाचै कौतूक केले जात आहे तर राजपूत संघटना कडवा विरोध करतेय.

वेळगावात काही अज्ञात युवकांनी असाच विरोध दर्शवत थिएटर्सबाहेर पेट्रोल बॉम्ब फेकला. पोलिसांनी यासंदर्भात माहिती दिली.

पेट्रोल बॉम्ब

यामध्ये सुदैवाने कोणती जिवितहानी झाली नाही. पण लोकांमध्ये दहशतीचे वातावरण आहे.

गुरुवारी रात्री काही हल्लेखोर बाईकस्वारांनी पेट्रोलने भरलेली बॉटल प्रकाश थिएटर्सच्या बाहेर फेकली. बॉटलचा स्फोट झाल्याने लोकांमध्ये भिती पसरली. 
 
या सिनेमाने प्रदर्शनानंतर दोन दिवसातच तिकिट विक्रीचे रेकॉर्ड तोडले आहेत.