नव्याकोऱ्या 21 लाखांच्या बाईकची वरात; कोल्हापूरात वाजत घरात; पाहा Video

नव्याकोऱ्या बाईकची ढोल ताशांच्या गजरात वाजत गाजत मिरवणूक 

Updated: Oct 28, 2022, 01:06 PM IST
नव्याकोऱ्या 21 लाखांच्या बाईकची वरात; कोल्हापूरात वाजत घरात; पाहा Video title=

प्रताप नाईक, झी मीडिया, कोल्हापूर : जगात भारी अशी ओळख असलेल्या कोल्हापुरात (Kolhapur) नेहमीच काहीतरी खास पाहायला मिळत असते. याचाच प्रत्यय पुन्हा एकदा आला आहे. याला कारण ठरलंय एक दुचाकी. एका तरुणाने आपली नवीकोरी दुचाकी (Bike) ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक काढत घरी आणली आहे. कोल्हापूरातील (Kolhapur) कळंबा येथे राहणाऱ्या राजेश चौगले या तरुणाने दीपावलीच्या (Diwali) मुहूर्तावर कावासाकी निंजा झेडएक्स 10 आर (Kawasaki Ninja ZX-10R) ही गाडी खरेदी केली. एवढ्यावरच न थांबता या तरुणाने त्याच्या नव्याकोऱ्या बाईकची ढोल ताशांच्या गजरात वाजत गाजत मिरवणूक काढली. (Kawasaki Ninja ZX 10R parade in Kolhapur)

ही गाडी फक्त मिरवणुकीमुळेच नाही तर तिच्या किंमतीमुळेही चर्चेत आली आहे. या बाईकची किंमत एक दोन लाख नसून ऍक्सेसरीज धरून तब्बल 21 लाख रुपये इतकी आहे. पश्चिम महाराष्ट्रात एवढ्या किमतीची ही पहिलीच गाडी असल्याने त्याने आगळ्या वेगळ्या पद्धतीने जंगी स्वागत केलय. त्यामुळे या दुचाकी गाडीच्या स्वागताचे कोल्हापुरी भाषेत कौतुक केलं जातं आहे. राजेश चौगले हा शेअर मार्केटिंगचा व्यवसाय करतो. त्याला गाड्यांची प्रचंड आवड आहे. राजेशकडे बुलेट तसेच इतर स्पोर्ट्स बाईक आणि कार आहेत. पश्चिम महाराष्ट्रात पहिल्यांदाच आता कावासाकी निंजा झेडएक्स रस्त्यावर धावताना दिसत आहे.

कशी आहे Kawasaki Ninja ZX-10R?

207 किलो वजनाच्या या पेट्रोल नवीन बाईकमध्ये 17 लिटरची इंधन टाकी आहे. या बाईकची राइडिंग रेंज 15 किलोमीटर प्रति लिटरच्या मायलेजसह 255 किमी प्रतितास आहे. याचा हाय स्पीड 302 किमी प्रतितास आहे. डिजिटल इग्निशन, 6-स्पीड, इलेक्ट्रिक स्टार्टसह रिटर्न ट्रान्समिशन सिस्टम बाईक चावणाऱ्याला स्पोर्टी फील देतो.