अजित पवारांना मुख्यमंत्री होण्यासाठी... चंद्रकांत पाटील हा कसला फॉर्म्युला सांगून गेले?

इतक्यावरच न थांबता 2024 पर्यंत तिन्ही पक्ष एकत्र राहणार का? हा खोचक प्रश्नही विचारला.   

Updated: Oct 28, 2022, 01:05 PM IST
अजित पवारांना मुख्यमंत्री होण्यासाठी... चंद्रकांत पाटील हा कसला फॉर्म्युला सांगून गेले?  title=
Chandrakant patil says ajit pawar become chief of maharastra only if Mahavikas Aghadi will have to bring majority in 2024 election

Maharashtra Political Crisis : राज्यात (vedanta foxconn) वेदांता फॉक्सकॉन पाठोपाठ आता एअरबस (tata airbus) हा प्रकल्प देखील गुजरातला (Gujrat) गेला आहे. यावरून विरोधक आक्रमक झाले असून शिंदे सरकारवर टिका केली जात आहे. सदर मुद्द्यावर राज्याचे उच्च- तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांना विचारलं असता ते म्हणाले, आपल्याला माध्यमांमुळेच ही बातमी समजल्याची प्रतिक्रिया दिली. 

अजित पवार मुख्यमंत्रीपदी...?

नुकतंच रोहित पवार (Rohit Pawar) यांनी आपल्याला अजित पवार (Ajit Pawar) यांना राज्याच्या मुख्यमंत्रीपही पाहायला आवडेल असं वक्तव्य केलं होतं. यावर आपलं मत मांडत लोकशाहीमध्ये कोणीही अशी इच्छा व्यक्त करू शकतो इतकं थेट शब्दांतील उत्तर त्यांनी दिलं. पण, यापुढे त्यांनी Majority म्हणजेच बहुमताचं वास्तव मांडत महाविकास आघाडीला 2014 च्या निवडणुकांमध्ये बहुमत आणआवं लागेल हे गणित मांडलं. बरं, इतक्यावरच न थांबता 2024 पर्यंत तिन्ही पक्ष एकत्र राहणार का? हा खोचक प्रश्नही विचारला. 

बच्चू कडूंबाबत (Bacchu Kadu) प्रश्न विचारला असता अशा प्रकारचे वाद हे जिवंत माणसांमध्ये होतच असतात. त्या वादाचं रूपांतर मनभेदात होऊ नये यासाठी नेत्यांनी प्रयत्न करावे. या दोन नेत्यांचे वाद मनभेदापर्यंत जाणार नाहीत याची काळजी घेण्यासाठी आमचे नेते सक्षम आहे.

साध्या नोटांवर फोटो बदलण्याची मागणी सातत्यानं होत असल्याचं पाहता शिवसैनिकांकडून राणेंचे (Narayan Rane) फोटो व्हायरल केले जात आहेत. याबाबत पाटील यांना विचारलं असता, 'दोन विरोधी पक्ष असतात. ते बऱ्याच वेळेस विचारांच्या आधारे विरोधक असतात. त्यामुळे विचारांची लढाई लढली पाहिजे. पण, वैक्तिक टीका टिप्पणी करू नये', असा विचार त्यांनी यावेळी मांडला. 

हेसुद्धा पाहा : Viral Video : 'मला वेडी बोलली?', भावाला ओवाळणाऱ्या चिमुकलीचा स्वॅग पाहिला का? 

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) हे आत्ता शेतकऱ्यांच्या बांधावर जात आहे. याबाबत विचारताच ते म्हणाले, आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांना उशिरा कळाल. महात्मा गांधी सारखे नेते तयार झाले ते देश फिरले, सर्वसामान्य नागरिकांशी बोलले, त्यांची मनं जिंकली, पण यांना अस वाटत होत की मातोश्री मध्ये थांबून च लोकांची मनं कळतात. आता मात्र त्यांना साक्षात्कार झाला ही चांगली गोष्ट. आपण सत्तेत असताना या गोष्टी केल्या नाही.याची जाणीव असली पाहिजे असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.