कडोंमपाचा लाचखोर निलंबित आयुक्त संजय घरतला जामीन

१३ जून रोजी घरत यांना ८ लाखांची लाच स्वीकारताना रंगेहात अटक करण्यात आली होती

Updated: Jun 22, 2018, 01:16 PM IST
कडोंमपाचा लाचखोर निलंबित आयुक्त संजय घरतला जामीन title=

कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे निलंबित अतिरिक्त आयुक्त संजय घरत यांना जामीन मंजूर करण्यात आलाय. ५० हजारांच्या जातमुचलक्यावर संजय घरत यांना हा जामीन मंजूर झालाय. त्यांच्यासोबत अटक करण्यात आलेले लिपिक आमरे आणि पाटील यांनाही जामीन मंजूर करण्यात आलाय. या तिघांना ८ लाखांची लाच घेताना अटक झाली होती. 

कल्याण डोंबिवली महापालिकेचे वादग्रस्त अतिरिक्त आयुक्त संजय घरत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या हातात सापडले होते. १३ जून रोजी घरत यांना ८ लाखांची लाच स्वीकारताना रंगेहात अटक करण्यात आली होती. २७ गावातल्या एका अनधिकृत बांधकामावर कारवाई न करण्यासाठी घरत यांनी ४२ लाखांची मागणी केली होती. या रक्कमेवर तडजोड होऊन ३५ लाख रूपये देण्याचं ठरलं होतं. मात्र, तक्रारदाराने याबाबत ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधला. लाचेतला पहिला ८ लाखांचा हफ्ता स्वीकारताना घरत अलगद जाळ्या सापडले. घरत यांच्या कार्यालयातल्या आमरे आणि पाटील या दोन लिपीकांनाही याप्रकरणात अटक करण्यात आली होती.