खानदेशातील खापरावरची भलीमोठी चवदार पुरणपोळी

खानदेश हा महाराष्ट्रातील खाद्य संस्कृतीच्या बाबतीत एक समृद्ध प्रांत समजला जातो.

Updated: Oct 6, 2018, 04:14 PM IST

जळगाव : खानदेश हा महाराष्ट्रातील खाद्य संस्कृतीच्या बाबतीत एक समृद्ध प्रांत समजला जातो. यात जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक जिल्ह्याचा कळवण, सटाणा, मालेगाव आणि देवळा, म्हणजे कसमादे पट्टा.

खानदेशातली पुरणपोळी ही मातीच्या खापरावर बनवली जाते, अनेक जण ही पुरणपोळी पाहिल्यानंतर तिला मांडे म्हणतात. पण खानदेशात वाढलेला माणूस या पोळीला पुरणपोळीच म्हणतो, हे विशेष.

अर्थात खानदेशातील लोकांनी ही पोळी म्हणजेच पुरणपोळी आणि इतर लोक करतात ती तव्यावरची पुरणपोळी असं ते म्हणतात, कारण खानदेशात खापरावरची पुरणपोळी म्हणजे पुरणपोळी असं मानलं जातं.

खानदेशात सणासुदीच्या दिवशी हमखास ही पुरणपोळी बनवली जाते. या पुरणपोळीची चव तव्यावर बनवल्या जाणाऱ्या पुरणपोळी पेक्षा किती तरी वेगळी आणि चवदार, कुरकुरीत आणि खुमासदार असते.

पुरणपोळी करता येणं. हे देखील त्या महिलेसाठी महत्वाचं असतं, सुगरण समजल्या जाणाऱ्या महिलाच खापरावरच्या पोळ्या व्यवस्थित बनवू शकतात असा देखील प्रघात खानदेशात आहे.

तर खालील व्हिडीओत पाहा खापरावरची पुरणपोळी कशी बनवली जाते.