प्रताप नाईक झी 24 तास कोल्हापूर : गड-किल्ले हे छत्रपती शिवरायांचा इतिहास सांगणारे आहेत. त्यांचा वारसा जपला पाहिजे. अशा परिस्थितीमध्ये काही हुल्लडबाजांनी पन्हाळा गडावर दारुपार्टी केली.
ऐतिहासिक पन्हाळा गडावर दारुपार्टी रंगल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. गडावरील झुणका भाकर केंद्रात ही दारुपार्टी रंगली होती. गंभीर बाब म्हणजे महिलाही या दारुपार्टीत दारु पीत होत्या.
शिवरायांचा आवडता गड म्हणून पन्हाळ्याची ओळख आहे. पण याच गडावर काही पर्यटक यथेच्छ दारू ढोसताना दिसत आहे. खर तर नजरेला पडेल अशा ठिकाणी हे पर्यटक दारू पीत आहेत.
पोलिसांच्या ही गोष्ट निदर्शनास आली नाही का असा प्रश्न पडला आहे. अशा मद्यपी पर्यटकांवर आता काय कारवाई करणार असा सवाल शिवप्रेमी करत आहेत.