कोल्हापूर : इचलकरंजीतील डॉ. अरुण पाटीलकडून कुमारी माता आणि विधवा महिलांच्या बाळांना विकत घेणाऱ्या २ दाम्पत्यांना अटक करण्यात आलीय. चंद्रपूर आणि मुंबईतील नेरुळ इथल्या दाम्पत्यांना अटक करण्यात आलीय.
अर्भकाची तस्करी करून त्या अर्भकाची 7 ते 8 लाख रुपयाला विक्री करणा-या इचलकरंजीमधील जवाहरनगर इथल्या डॉ. अरुण पाटीलला केंद्रीय पथकानं धाड टाकून रंगेहाथ पकडल होतं. यानंतर चंद्रपूर आणि नेरुळ इथं शिवाजीनगर पोलिसांची पथकं रवाना झाली होती.
चंद्रपूर इथले अनिल चहांदे आणि प्रेरणा चहांदे या दाम्पत्याचा पोलिसांनी कसून तपास केला. तपासात चहांदे दाम्पत्याने अरुण पाटीलकडून बाळ खरेदी केल्याचं मान्य केलं. दोन्ही दाम्पत्याकडून ताब्यात घेतलेल्या बालकांना कोल्हापुरातील बालकल्याण समितीकड सुपूर्द करण्यात आलंय.