शाळेत मोठा राडा, संतप्त ग्रामस्थांची शाळेवर दगडफेक

 Kolhapur : angry villagers throwing stones at school: कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोलीमधल्या शाळेत मोठा राडा झाला.  

Updated: Apr 4, 2022, 03:33 PM IST
शाळेत मोठा राडा, संतप्त ग्रामस्थांची शाळेवर दगडफेक title=

कोल्हापूर : Kolhapur : angry villagers throwing stones at school: जिल्ह्यातील शिरोलीमधल्या शाळेत मोठा राडा झाला. संतप्त ग्रामस्थांनी शाळेवर दगडफेक केली. या शाळेतल्या शिक्षकांच्या त्रासाला कंटाळून आर्यन बुडकर या दहावीच्या विद्यार्थ्यानं आत्महत्या केली होती. 

दहावीच्या विद्यार्थ्याच्या आत्महत्येप्रकरणी मुख्याध्यापक, संस्थापक, चालकावर गुन्हा दाखल झाला आहे. त्यांच्यावर कोणतीच कारवाई झालेली नाही. या घटनेनंतर ते फरार आहेत. त्यांना लवकर अटक करावी, अशी ग्रामस्थांची मागणी आहे. 

शिक्षकाकडून विद्यार्थ्यांना त्रास देण्यात येत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. शिक्षकावर कारवाई व्हावी यासाठी शाळेवर मोर्चा काढण्यात आला होता. सध्या गावात तणाव आहे. तसेच मोठा पोलीस बंदोबस्त तैनात आहे.