बोगस सैन्य भरतीचा पर्दाफाश, खोटी फिजिकल परीक्षा घेत लाखोंचा गंडा

सैन्यात भरती करतो म्हणून पैसे उकळणारे रॅकेट कोल्हापूर पोलिसांच्या हाती 

Updated: Dec 18, 2020, 11:03 AM IST

प्रताप नाईक, झी मीडिया, कोल्हापूर : सैन्यात भरती करतो म्हणून पैसे उकळणारे रॅकेट कोल्हापूर पोलिसांच्या हाती लागलंय. आसाम रायफलमध्ये भरती करतो म्हणून अनेक तरुणांकडून रॅकेटमधील आरोपीने पैसे उकळल्याचे समोर आलंय. फसवणूक झालेल्या तरुणांची आसाममध्ये खोटी फिजिकल परीक्षा घेण्यात आली होती. 

परिक्षेनंतर तरुणांना भारतीय सैन्याच बनावट नियुक्ती पत्र देण्यात आले.रॅकेटची व्याप्ती मोठी असल्याचा संशय पोलिसांना आहे.एका तरुणांच्या फसवणूक प्रकरणात तरुणांच्या चुलत मामाने 6 लाख रुपये उकळले होते. या प्रकरणानंतर ही घटना समोर आली. सध्या दोघा आरोपींची नावे पोलिसांच्या हाती लागली आहेत.

त्यांनी आर्मी भरतीसारखे वातावरण  तसेच लेटरपॅड देखील तयार केले होते. पण प्रत्यक्षात तसे काही नव्हते हे उमेदवारांच्या लक्षात आले. याप्रकरणी २ जणांना अटक करण्यात आलीय. पण यामागे मोठं रॅकेट असल्याचा संशय कोल्हापूर पोलीस अधिक्षक शैलेश बलकावडे यांनी व्यक्त केलाय.