सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी : कोरोनावरील खर्चाची होणार परतफेड

कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांचा कोरोनावरील खर्चाची  परतफेड 

Updated: Dec 18, 2020, 10:13 AM IST

मुंबई : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना (State Government Employee) दिलासा देणारी बातमी समोर येतेय. कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांचा कोरोनावरील (Covid19 Test) खर्चाची  परतफेड (Reimbursement) करण्यात येणार आहे. मेडिक्लेममध्ये (Mediclaim) कोविड-19 (Covid19)आजाराचा समावेश करण्यात आलाय. खासगी रुग्णालयातील उपचाराचा खर्चही सरकार परत मिळणार आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी यासंदर्भात माहिती दिली.

स्वदेशी वॅक्सिन यशस्वी 

दरम्यान कोरोना वॅक्सिन संदर्भात देखील एक आनंदाची बातमी आहे. भारत बायोटेक आणि आईसीएमआरची स्वदेशी Covaxin पहिल्या टप्प्यात यशस्वी झाल्याची आनंदाची बातमी समोर येतेय. झालेल्या परिक्षणात ही वॅक्सिन सुरक्षित ठरलीय. पहिल्या टप्प्यात ३७५ जणांना वॅक्सिन देण्यात आली. केवळ एका व्यक्तीमध्ये साईड इफेक्ट आढळला. पण Covaxin हे त्यामागचं कारण नव्हतं.