रक्ताचे डाग, पोत्यावर गीता - प्रताप... हातात कोयता घेऊन फिरणाऱ्या तरुणाने सांगितलं धक्कादायक सत्य

kolhapur : गेल्या काही दिवसांपासून कोल्हापुरात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होताना दिसत आहे. शनिवारी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या तरुणाकडून धक्कादायक माहिती समोर आली आहे.

Updated: Jan 29, 2023, 10:13 AM IST
रक्ताचे डाग, पोत्यावर गीता - प्रताप... हातात कोयता घेऊन फिरणाऱ्या तरुणाने सांगितलं धक्कादायक सत्य title=

Crime News : कोल्हापुरात (kolhapur) गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या (kolhapur Crime News) घटनांमध्ये सातत्याने वाढ होताना दिसत आहे.  कोल्हापुरात तरुणाने सख्खा बहिणीची हत्या केल्याने एकच खळबळ उडाली आहे. रक्ताने माखलेला कोयता घेऊन हा तरुण रस्त्याने फिरत होता. पोलिसांना (kolhapur Police) याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी तात्काळ या तरुणाला ताब्यात घेतलं. तरुणाने चौकशीमध्ये बहिणीचा खून केल्याची माहिती दिली आहे. पोलिसांनी आता मृतदेहाचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे.

पोलिसांनी तरुणाला घेतलं ताब्यात

कोल्हापुरातील पन्हाळा तालुक्यातील वाघबीळ घाट येथे एक तरुण रक्ताने माखलेला कोयता हातात घेऊन फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. हा तरुण दारूच्या नशेत कोयता घेऊन फिरत होता. त्यानंतर पोलिसांनी तरुणाला ताब्यात घेऊन चौकशी केली. चौकशीनंतर तरुणाने आपण सख्ख्या बहिणीचा खून केला असल्याचे त्याने सांगितले. दारूच्या नशेत तरुणाने बहिणीचा खून केला असावा असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. मात्र घटनास्थळी मृतदेह आढळून आढळला नसल्याने वेगळीच शंका निर्माण झाली आहे. घटनास्थळी रक्ताचे डाग असलेले पोते आढळले आहे. तसेच रस्त्याच्या कडेला रक्ताचे डाग आढळले आहेत. 

दुसरीकडे हत्येनंतर तरुणाने एका पोत्यावर गीता प्रताप असेही लिहीले होते. मात्र मृतदेह अद्याप हाती न लागल्याने पोलिसांनी शोध सुरु केला आहे. तरुणाच्या म्हणण्यानुसार त्याने बहिणीची हत्या का केली आणि तिचा मृतदेह कुठे आहे याबाबत पोलिसांनी चौकशी सुरु केली आहे. तसेच पोत्यावर रक्ताने गीता - प्रताप असे का लिहिले याबाबतही तरुणाकडे पोलिसांनी विचारणा केली आहे.

दरम्यान, करवीर तालुक्यातील दोनवडे येथे कौटुंबिक वादातून पतीने दोरीच्या साहाय्याने गळा आवळून पत्नीचा खून केल्याची घटना घडली. अश्विनी एकनाथ पाटील (28) असे या महिलेचे नाव आहे. तसेच शनिवारी दुपारी चारच्या सुमारास जयंती नाल्यात जलशुद्धीकरण केंद्राजवळ एका 35 वर्षीय महिलेचा मृतदेह आढळला आहे. या महिलेने आत्महत्या केली की, तिचा घातपात झाला याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.