Eknath Shinde म्हणतात, "...तेव्हा मी सलग 3 दिवस एकही मिनिट झोपलो नाही"

CM Eknath Shinde: माझ्याभोवती असलेली गर्दी हेच माझं टॉनिक आहे. लोकांची गर्दी हीच माझी उर्जा असल्याचं शिंदे यांनी यावेळी म्हटलंय.

Updated: Jan 29, 2023, 12:41 AM IST
Eknath Shinde म्हणतात, "...तेव्हा मी सलग 3 दिवस एकही मिनिट झोपलो नाही"
Eknath Shinde

Maharastra Political News: मागचं वर्ष गाजलं ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या ऐतिहासिक बंडामुळे. शिवसेनेतील 40 आमदारांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली बंडखोरी केली. चाळीस आमदारांच्या गुवाहटी दौऱ्यानंतर राज्यातील महाविकास आघाडी सरकार (MahaVikas Aghadi Govt) कोसळलं. त्यावेळची अनेक किस्से आजही ऐकायला मिळतात. अशातच आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एका कार्यक्रमात मोठं वक्तव्य केलंय. (Eknath shinde said dont sleep for one minute in three days of shiv sena mla revolt Maharastra Political News)

जेव्हा आमदारांनी बंडखोरी केली, तेव्हा मी तीन दिवसात एक मिनिट देखील झोपलो नव्हतो. तेव्हा वेळच तशी होती. मात्र आता कामाचा भार आहे. लोकांनाही भेटावं लागतं होतं, असं एकनाथ शिंदे म्हणाले आहेत. माझ्याभोवती असलेली गर्दी हेच माझं टॉनिक आहे. लोकांची गर्दी हीच माझी उर्जा असल्याचं शिंदे (Eknath Shinde) यांनी यावेळी म्हटलंय.

प्रशासकीय कामं असतात. शासकीय बैठका असतात. जबाबदारी आहे तर पार पाडण्याचं काम करतो. या सर्व कामांमुळे झोप कमी होते मात्र चालून जाते, असंही एकनाथ शिंदे  (Eknath Shinde)  म्हणाले आहेत. तुम्ही कायमच लोकांमध्ये दिसतात. त्यावेळी त्यांनी समृद्धी महामार्गावर (Samruddhi mahamarga) देखील भाष्य केलं.

आणखी वाचा - अमृता फडणवीस यांच्याविषयी आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्या भाजप नेत्यावर कारवाई; एका वर्षासाठी केले तडीपार

दरम्यान, गुत्तेदाराला एक-दीड हजार शेततळे बांधायला लावलं. कुठंच आम्ही जोर-जबरदस्ती केली नाही. मी फिल्डवर जावून थेट गावात जावून लोकांना प्रकल्प समजून सांगितला. त्यामुळे भूसंपादन (Land acquisition) होऊ शकलं, असंही एकनाथ शिंदे म्हणाले आहेत.