कोल्हापूर : जिल्ह्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी खुशखबर आहे. गोकुळकडून गायीच्या दुधाच्या खरेदीत दोन रुपयांची वाढ करण्यात आली आहे. तर म्हैशीच्या दुधाच्या खरेदीत १.७० रुपये इतकी वाढ करण्यात आली आहे. ही दरवाढ १ फेब्रुवारीपासून नवीन दरानुसार दुधाची खरेदी केली जाणार आहे.
जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकूळ) संघाने या दरवाढीचे परिपत्रक संघामार्फत प्राथमिक दूध संस्थाना पाठवणेत आले आहे. गायी दूध दरामध्ये ३.५ फॅट आणि ८.५ एस.एन.एफ करिता प्रतिलिटर दोन रूपये इतकी वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे गाय दूध दर २७ रूपये वरून आता २९ रूपये इतका होणार आहे.
BREAKING NEWS : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) संघाने गाय, म्हैशीच्या दूध दरात वाढ केली आहे. ही दरामध्ये १ फेब्रुवारीपासून ही दरवाढ करण्यात येणार आहे. गायीचे दूध दर २७ रूपयांवरून आता २९ रूपये इतका होणार आहे. https://t.co/7va86JWkAh pic.twitter.com/cZvSt1prml
— ZEE २४ तास (@zee24taasnews) January 14, 2020
तसेच म्हैशीच्या दूध खरेदी दरामध्ये ७.० फॅट आणि ९.० एस.एन.एफ करिता एक रूपये सत्तर पैसे इतकी वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे म्हैस दूध खरेदी दर ४२. ३० पैसे वरून ४४ रुपये इतका होणार आहे.