close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

प्रेमात अडथळा ठरलेल्या सासुचा सुनेकडून खून

अनैतिक संबंधाला अडसर ठरणाऱ्या सासूचा सून आणि सुनेच्या प्रियकराकडून खून 

Updated: Sep 24, 2019, 12:42 PM IST
प्रेमात अडथळा ठरलेल्या सासुचा सुनेकडून खून

कोल्हापूर : प्रियकराच्या मदतीने सासूचा खून केल्याची धक्कादायक घटना कोल्हापूर जिल्ह्यातील हालकर्णी इथे घडली आहे. अनैतिक संबंधाला अडसर ठरणाऱ्या सासूचा सून आणि सुनेच्या प्रियकराकडून खून करण्यात आला आहे. माणुसकीला काळीमा फासणाऱ्या या घटनेमुळे हालकर्णी विभाग परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. बसव्वा पाटील अस मृत सासूचे नाव आहे. तर मालश्री पाटील असे 24 वर्षीय सुनेच नाव आहे.  

आरोपी सुन मालश्री पाटीलचे एका पुरुषाशी (प्रियकराशी) अनैतिक संबध होते. याची माहीती सासु बसव्वा यांना मिळाली होती. तसेच तिने आपल्या मालश्रीला तिच्या प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत पाहिले होते. ही बाब सर्वांसमोर उघड होऊन आपली बदनामी होऊ नये म्हणून मालश्रीने प्रियकराच्या मदतीने सासूचा खून केला. यासाठी दोघांनी कट रचला आणि त्यानुसार सासुचा जीव घेतला. 

दोघांनी योजना आखत सासुच्या डोक्यात लाकडी दांडक्याने हल्ला चढवला. या हल्ल्यात बसव्वा दगावल्या. या खुनानंतर पोलिसांनी सगळीकडे चौकशी केली. पण त्यावेळी पोलिसांना कोणता सुगावा लागला नाही. हा खून दरोडेखोरांनी केल्याचा बनाव मालश्री पाटीलने केला होता. पण तपासावर पोलिसांचे समाधान होत नव्हते. त्यांनी आपल्या तपासाचा वेग वाढवला. अवघ्या काही तासात सून मालश्री पाटील आणि प्रियकर रुपेश याला अटक केली.