सातारा : सातारा लोकसभेची पोटनिवडणूक विधानसभेसोबतच होणार आहे. २१ ऑक्टोबरला विधानसभेच्या निवडणुकांसोबतच साताऱ्याची पोटनिवडणूक होणार आहे. निवडणूक आयोगाच्या या घोषणेमुळे उदयनराजे भोसले यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
निवडणूक आयोगाने शनिवारी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या. मात्र, त्याळी सातारा लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली नव्हती.
महाराष्ट्रात एकाच टप्प्यात विधानसभा निवडणूक होणार असून त्यासाठी २१ ऑक्टोबर रोजी मतदान होईल. त्यामुळे साताऱ्यातील पोटनिवडणुकही याच दिवशी व्हावी, अशी अट उदयनराजे यांनी पक्षप्रवेशावेळी भाजपसमोर ठेवली होती. याशिवाय, पोटनिवडणुकीत दगाफटका झाल्यास राज्यसभेवर पाठवण्याचे आश्वासनही उदयनराजे यांनी भाजपकडून घेतल्याचे समजते.