प्रताप नाईक, झी मीडिया, कोल्हापूर : कोल्हापूर (Kolhapur) शहरातील एका हॉटेल (Hotel) मध्ये औरंगजेबाच्या (Aurangzeb) वंशजांचा फोटो लावण्यावरून वाद निर्माण झलाय. शहरात असणाऱ्या बिर्याणी बाय किलो या हॉटेल मध्ये इंटिरिअर डिझाइन (Interior Design) करत असताना हॉटेल मालकाने औरंगजेबच्या वंशजाचे फोटो लावले असल्याचा आरोप करण्यात आला. यातून हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी हॉटेल मध्ये जात हॉटेल मालक आणि कामगार यांना जाब विचारला. त्यावेळी हॉटेल मालक आणि कामगारांनी उडवाउडवीची उत्तर दिली.
यावरुन संतापलेल्या हिंदुत्त्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी हॉटेलमधील कामगाराना शिवीगाळ करत मारहाण करून औरगजेबच्या वंशजांचा फोटो फाडला. यावेळी जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली..
हॉटेलमध्ये मुगल काळातील फोटोंचं इंटरियर डिझाईन
कोल्हापूर शहरातील राजारामपुरी इथं असलेल्या बिर्याणी बाय किलो या बिर्याणी हॉटेल मध्ये मुघलकालीन इंटेरिअर करण्यात आलं आहे. यामध्ये मुघलकालीन अनेक सम्राट, कवी, संत याचे फोटो लावण्यात आले होते. पण काही दिवसापासून या हॉटेल मध्ये लावलेला फोटो औरंगजेबाचा असल्याचा मॅसेज सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यामुळे संतप्त झालेल्या शिवप्रेमींनी हॉटेलमध्ये घुसून हॉटेल कर्मचाऱ्यांना जाब विचारला.
हे ही वाचा : समुद्रात पोहताय? सावधान ! जेली फिशनं गीताचं उद्ध्वस्त केलं करियर
त्यावेळी हॉटेल कर्मचाऱ्यांनी उडवा उडावीचे उत्तर दिल्याने संतप्त झालेल्या शिवसैनिकानी हॉटेल कामगारांना मारहान केली त्याचबरोबर हॉटेल मधील मुघलकालीन असणारे फोटो काढून रस्त्यावर टाकले. त्याचबरोबर जोरदार घोषणाबाजी केली. दरम्यान लावण्यात आलेला फोटो हा औरंगजेबचा नसून तो विसावा आणि शेवटचा मुघल सम्राट तसेच उर्दू कवी होता अशी माहिती समोर आली आहे. तरी देखील शिवप्रेमीनी मुघलकालीन इंटिरिअर डिझाइनला आपला विरोध राहील असा इशारा देत हॉटेल मध्ये पुन्हा असे पोस्टर लावले तर हॉटेल पेटवून देवू असा इशारा दिलाय.