close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

निकालाआधीच्या मिरवणुकीत राष्ट्रवादीच्या हसन मुश्रीफांची उदयनराजे स्टाईल

कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव हसन मुश्रीफ यांनी उदयनराजे स्टाईल कॉलरही उडवली.

Updated: Oct 22, 2019, 07:05 PM IST
निकालाआधीच्या मिरवणुकीत राष्ट्रवादीच्या हसन मुश्रीफांची उदयनराजे स्टाईल

कोल्हापूर : जिल्ह्यातील कागल विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार हसन मुश्रीफ आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी मतदानानंतर निकाल लागण्यापूर्वीच जल्लोष साजरा केला. कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत हसन मुश्रीफ यांना खांद्यावर घेवून मिरवणूकही काढली. 

यावेळी कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव हसन मुश्रीफ यांनी उदयनराजे स्टाईल कॉलरही उडवली. या मतदारसंघात तिरंगी लढत होत आहे. भाजपचे बंडखोर समरजित घाटगे आणि शिवसेनेचे संजय घाटगे यांच्याशी मुश्रिफ यांची लढत झाली आहे.