शेतकरी, मच्छीमारांना परतीच्या पावसाचा फटका

शेतात भात पिक कुजण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Updated: Oct 23, 2019, 09:34 PM IST
शेतकरी, मच्छीमारांना परतीच्या पावसाचा फटका title=
संग्रहित फोटो

हर्षद पाटील, झी मीडिया, पालघर : रायगड, पालघर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग कोकण पट्ट्यातील भाताचं कोठार म्हणून ओळखले जाणारे हे जिल्हे. पण या पट्ट्यातल्या शेतकऱ्यांच्या तोंडचं पाणी पळालंय. गेल्या आठवड्यापासून सुरु असलेल्या पावसामुळे खाचरांमध्ये भाताची रोपं पडल्याचं चित्र आहे. पाण्यामुळं हातातोंडाशी आलेलं पिक पाण्यात भिजलंय. काही ठिकाणी कापणी झाली, पण मळणी करता येत नाही. यामुळे शेतात भात पिक कुजण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

किनारपट्टी भागात सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यात मोठ्या प्रमाणात मासळी मिळते. अतिरिक्त मिळालेली मासळी सुकवण्यासाठी ठेवली जाते. पावसामुळे ही मासळी आता ओली झाली आहे. ओली मासळी कुजण्याची भीती आहे. त्यामुळे मच्छीमारांमध्ये चिंतेचं वातावरण आहे.

  

अजून काही दिवस पाऊस असाच राहिल्यास कोकण पट्ट्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची वेळ सरकारवर येण्याची शक्यता आहे.