परमबीर सिंह आणि रश्मी शुक्ला यांना समन्स, या चौकशीसाठी हजर व्हा !

Bhima Koregaon violence News : कोरेगाव भीमा हिंसाचारप्रकरणी IPS अधिकारी परमबीर सिंह (Param Bir Singh) आणि रश्मी शुक्ला (Rashmi Shukla) यांना समन्स पाठविण्यात आले आहेत. 

Updated: Oct 23, 2021, 08:07 AM IST
परमबीर सिंह आणि रश्मी शुक्ला यांना समन्स, या चौकशीसाठी हजर व्हा ! title=
Pic Courtesy : DNA

पुणे : Bhima Koregaon violence News : कोरेगाव भीमा हिंसाचारप्रकरणी (Bhima Koregaon violence ) IPS अधिकारी परमबीर सिंह (Param Bir Singh) आणि रश्मी शुक्ला (Rashmi Shukla) यांना समन्स पाठविण्यात आले आहेत. 8 नोव्हेंबरला चौकशी आयोगासमोर हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दरम्यान, परमबीर सिंह कुठे आहेत, ते अद्याप माहित नाहीत. त्यामुळे ते उपस्थित राहणार का, याची मोठी उत्सुकता आहे. (Koregaon Bhima Commission of Inquiry passes an order to summon former Mumbai Police Commissioner Param Bir Singh and IPS officer Rashmi Shukla to appear before them on 8th November 2021)

माजी मुंबई पोलीस आयुक्त परामबीर सिंग आणि आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांना कोरेगाव भीमा चौकशी आयोगाने समन्स बजावले आहेत. आयोगाचे वकील आशिष सातपुते यांनी या संदर्भात अर्ज केला. कोरेगाव भीमा हिंसाचार घडला त्यावेळी परमबीर सिंह (Param Bir Singh) हे कायदा आणि सुव्यवस्था पाहत होते. तसेच रश्मी शुक्ला या पुणे पोलीस आयुक्त म्हणून काय पाहत होत्या. हिंसाचाराच्या घटनेच्या अनुषंगाने त्यांच्याकडील इंटेलिजन्स इनपुट आणि इतर माहिती महत्वाची असल्याने, त्यांची साक्ष आवश्यक असल्याचे आशिष सातपुते यांनी म्हटले आहे.

सातपुते यांचा अर्ज मंजूर करताना आयोगाचे अध्यक्ष माजी न्यायमूर्ती जे एन पटेल यांनी परमबीर सिंह आणि रश्मी शुक्ला यांना समन्स जारी करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार त्यांना हे समन्स पाठविण्यात आले आहेत.