लालू प्रसाद यादव यांना एशियन हॉस्पीटलमधून डिस्चार्ज

 ५ दिवसांनंतर आज त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

Updated: Aug 25, 2018, 04:59 PM IST
लालू प्रसाद यादव यांना एशियन हॉस्पीटलमधून डिस्चार्ज  title=

गणेश कवडे, झी मीडिया, मुंबई : चारा घोटाळ्यात शिक्षा भोगत असणारे राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव मुबंई तील एशियन हॉस्पीटलमध्ये उपचार घेत होते. ५ दिवसांनंतर आज त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.  या अगोदर देखील लालूं प्रसाद हे देखील उपचार घेण्यासाठी आले होते.

चारा घोटाळ्यात दोषी 

पशुखाद्य गैरव्यवहारातील (चारा घोटाळा) चौथ्या प्रकरणी बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांना 'सीबीआय'च्या विशेष न्यायालयाने सात वर्षांची शिक्षा सुनावली. तसेच ३० लाखांचा दंडही ठोठावण्यात आला.

दोन दशकांपूर्वी डुमकाच्या कोशागारातून ३.७६ कोटी रुपये काढल्याचा आरोप लालूप्रसाद तसेच अन्य  १८ जणांवर होता. १९९०च्या दशकात डुमका ट्रेझरीमधून गैरमार्गाने ३.१३  कोटी रुपये काढल्याप्रकरणी न्यायाधीशांनी लालू आणि इतर १७ जणांना दोषी ठरविले, तर मिश्रा आणि इतर ११ जणांची आरोपातून मुक्तता केली. सध्या लालू शिक्षा भोगत आहेत.

चौकशी सुरू 

नोटबंदीच्या काळात सहकारी बॅंकेत दहा लाख रुपये जमा करण्याच्या आरोपावरून लालू प्रसाद यादव यांची पत्नी व माजी मुख्यमंत्री राबडी देवी यांची चौकशी करण्यासाठी सीबीआयचे पथक त्यांच्या घरी पोहचले. मागील दीड वर्षापासून या सहकारी बॅंकेची सीबीआय चौकशी सुरू आहे.

अनेक खोट्या खातेदारांच्या माध्यमातून करोडो रुपये जमा केल्याच्या आरोपावरून या बॅंकेची चौकशी सुरू आहे. याआधी राष्ट्रीय जनता दलाचे माजी विधान परिषद सदस्य अनवर महमद यांच्या मुलाला या प्रकरणात अटकही करण्यात आले होते.