माळशेज घाटात ३१ऑगस्टपर्यंत पर्यटकांना बंदी

घाटात दरड कोसळत असल्याने पर्यटकांच्या सुरक्षेसाठी हा निर्णय घेण्यात आलायं. 

Updated: Aug 25, 2018, 11:07 AM IST
माळशेज घाटात ३१ऑगस्टपर्यंत पर्यटकांना बंदी title=

ठाणे : माळशेज घाटात ३१ऑगस्टपर्यंत पर्यटकांना बंदी घालण्यात आली आहे. मुरबाडचे तहसीलदार सचिन चौधर यांनी याबद्दल माहिती दिली. घाटातील अतिधोकादायक धबधबे ,सेल्फी पाँईट,आशा ठिकाणी पर्यटकांनी जावु नये असे यावेळी सांगण्यात आले आहे. घाटात दरड कोसळत असल्याने पर्यटकांच्या सुरक्षेसाठी हा निर्णय घेण्यात आलायं.

मातीचा ढिग 

माळशेज घाटात  मंगळवारी पहाटे दरड कोसळली होती. त्यामुळे घाटातील वाहतुकीवर त्याचा मोठा परिणाम झाला. सुरूवातीचा काही काळ अडचणीतून मार्ग काढत सुरू असलेली वाहतूक खबरदारीचा उपाय म्हणून पूर्णपणे थांबविण्यात आली. दरड कोसळल्यामुळे मार्गावर मोठे दगड आणि मातीचा ढिग साचला आहे. दरड हटविण्याचे काम सुरू आहे मात्र घाटातील धुके, वारा आणि ढगाळ वातावरणामुळे कमी प्रकाश असल्याने दरड हटविण्याच्या कार्यात अडथळा येत आहे.