Lanslide At Raigad Fort : किल्ले रायगडावर दरड कोसळल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेत एका शिवप्रेमीचा मृत्यू झाला आहे. स्वराज्याची राजधानी अशी ओळख असलेल्या किल्ले रायगडावर नुकताच शिवराज्याभिषेक सोहळा पार पडला. किल्ले रायगडला पर्यटक मोठ्या संख्येने भेट देत असतात. यामुळे रागडावर जाताना पर्यटकांनी स्वत:च्या सुरक्षेची काळजी घेणे गरजेचे आहे.
रविवारी संध्याकाळच्या सुमारास ही घटना घडली. प्रशांत गुंड असं मृत पर्यटकाचे नाव आहे. 29 वर्षीय प्रशांत मूळचा सोलापूरचा असून सध्या पुण्यात वास्तव्याला आहे. तो मित्रासोबत रायगड किल्ल्यावर फिरण्यासाठी आला होता. तिथून पायी परतत असताना अंगावर दरड कोसळून त्याचा मृत्यू झाला. त्याचा मृतदेह महाड ग्रामीण रुग्णालयात शव विच्छेदनासाठी आणण्यात आला आहे.
रायगड जिल्ह्याच्या काही भागात मान्सून पूर्व पावसानं जोरदार हजेरी लावली. कर्जत, खालापूर, महाड तालुक्यात पावसाच्या जोरदार सरी बरसल्या. त्यामुळे हवेत चांगलाच गारवा निर्माण झालय. वादळी वा-यांमुळे खोपोलीत झाडं आणि विजेचे खांब कोसळले आहेत. तर या पावसामुळे माथेरानमध्ये आलेले पर्यटक सुखावलेत.
स्वराज्याची राजधानी किल्ले रायगडावर आज शिवराज्याभिषेक दिन मोठ्या उत्साहात पार पडला. मुख्यमंत्री शिंदे फडणवीसांच्या हस्ते शिवरायांच्या मूर्तीला जलाभिषेक करण्यात आला. त्याआधी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते ध्वजपूजन करण्यात आले. तिथीप्रमाणे 6 जूनला शिवराज्याभिषेक दिन सोहळा संपन्न झाला. किल्ले रायगडावर शिवरायांची आरती करण्यात आली. त्यानंतर पोलिसांकडून शिवरायांना मानवंदना देण्यात आली...या कार्यक्रमाला उदयनराजे भोसले, सुधीर मुनगंटीवार, चंद्रकांत पाटील, गोगावले, उदय सामंत उपस्थित होते. तसंच देशभरातून लाखो शिवभक्त किल्ल्यावर दाखल झाले होते.