भिवंडीत अग्नितांडव, फर्निचर गोदामांसह कारखान्याला आग

 Fire in Bhiwandi : भिवंडीत (Bhiwandi ) मोठे अग्नितांडव पाहायला मिळाले. 

Updated: Oct 16, 2021, 07:10 AM IST
भिवंडीत अग्नितांडव, फर्निचर गोदामांसह कारखान्याला आग

ठाणे :  Fire in Bhiwandi : भिवंडीत (Bhiwandi ) मोठे अग्नितांडव पाहायला मिळाले. फर्निचर गोडाऊनसह कारखान्याला आग (Fire ) लागल्याने लाखो रूपयांचे फर्निचर खाक झाले आहे. भिवंडी, ठाणे, कल्याण डोंबिवली अग्निशमन दलाची शर्थ प्रयत्न सुरु होते. या आगीत आजूबाजूची दुकानंही जळून खाक

भिवंडीत आगीचं सत्र थांबलेलं नाही. भिवंडीत काल उशिरा फर्निचर गोदामांसह कारखान्याला भीषण आग लागली. भिवंडी - ठाणे मार्गावर भिवंडी तालुक्यातील कशेळी टोलनाक्यानजीकच महालक्ष्मी फर्निचर नावाचे मोठे शोरूम आणि कारखाना आहे. भिवंडी, कल्याण डोंबिवली, ठाणे इथल्या अग्निशमन दलांनी आग विझवण्यासाठी शर्थ केली. मात्र आग एवढी भीषण आहे की अग्निशमनाला आणखी काही तास लागतील अशी शक्यता आहे. आग नेमकी कशामुळे लागली याचं कारण उघड झालेलं नाही. आगीमुळे शेजारची इतर दुकानंही जळून खाक झाली. 

दरम्यान, ही आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण अद्यापही समजू शकले नाही. आतापर्यत या आगीत कोणीही जखमी झाले नसल्याचेही सांगण्यात आले. घटनास्थळी स्थानिक नारपोली पोलिसांचे पथक दाखल असून परिसरातील वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. विशेष म्हणजे काही लगतचे दुकानेही आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याने आगीची तीव्रता अधिकच वाढली आहे.