वाळूमाफियांवर राज्यातील सर्वात मोठी कारवाई

वाळूमाफियांवर राज्यातील सर्वात मोठी कारवाई करण्यात आलीये. पोलिसांनी वाळूचे ६० हून अधीक ट्रक जप्त केलेत.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Feb 23, 2018, 07:35 AM IST
वाळूमाफियांवर राज्यातील सर्वात मोठी कारवाई  title=

अमरावती : वाळूमाफियांवर राज्यातील सर्वात मोठी कारवाई करण्यात आलीये. पोलिसांनी वाळूचे ६० हून अधीक ट्रक जप्त केलेत.

कोट्यवधी रुपयांची अवैध वाळू जप्त 

कोट्यवधी रुपयांची अवैध वाळू पोलिसांनी जप्त केलीये.. अजुनही जप्तीची कारवाई सुरु असल्याचं सांगीतलं जातंय. अमरावती पोलीस विभागातील विशेष पोलीस शाखेने बोरगाव धांदे या रेतिघंटावरून होत असलेल्या अवैध वाहतूक आणि उत्खननावर पाळत ठेवली होती. 

 ६० ट्रकवर कारवाई

त्यानंतर काल पहाटे ४वाजता विशेष शाखेने ,गुन्हे शाखा,तळेगाव पोलिसांना सोबत घेऊन धाड घालून ३ पोकलँड आणि अवैध रेती वाहून नेणाऱ्या जवळपास  ६० ट्रकवर कारवाई केली आहे.  हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे.