Latur News : मुलीसाठी स्थळ पाहायला गेले अन्... चौघांच्या मृत्यूने कुटुंबियावर काळाचा घाला

Latur News : हा अपघात इतका भीषण होता की कारचा अक्षरक्षः चुराडा झाला आहे. या अपघातामध्ये चौघांचा जागीच मृत्यू झाला तर दोघांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. भरधाव कार अपघातानंतर शेजारच्या शेतात जाऊन पडली होती

Updated: Mar 24, 2023, 04:07 PM IST
Latur News : मुलीसाठी स्थळ पाहायला गेले अन्... चौघांच्या मृत्यूने कुटुंबियावर काळाचा घाला title=

Latur News : लातूर (Latur) जिल्ह्यातील निलंगा ते औराद महामार्गावर कारचा भीषण अपघात (Latur Accident) झाल्याची माहिती समोर आली आहे. या भीषण अपघातात चौघांचा मृत्यू झाला आहे. चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने हा गंभीर अपघात झाला आहे. अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली आणि पोलिसांनी (Latur Police) याची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत गाडीतील इतर जखमींना निलंगा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे.

निलंग्यावरून औरादकडे जात असताना हा अपघात झाला आहे. भरधाव वेगात असलेल्या कार चालकाचा ताबा सुटल्याने गाडी उलटली. या भीषण अपघातात चार जण जागीच ठार झाले. तर दोन जण जखमी झाले आहेत. हा अपघात इतका भीषण होता की भरधाव असलेली कार उलटल्यानंतर थेट शेजारच्या शेतात जाऊन पडली.

अपघातात मृत्यूमुखी पडलेले हे चाकूर येथील रहिवासी आहेत. मुलीची सोयरीक जुळवण्यासाठी ते औरादकडे जात होते. दरम्यान, जखमींना तात्काळ निलंगा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

रेल्वे रुळ ओलांडताना अख्ख कुटुंबच संपलं

रेल्वे रुळ ओलांडता एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाल्याची घटना विरारमध्ये घडली आहे. रेल्वे रुळ ओलांडताना ट्रेनची धडक बसल्याने तिघांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये एक पुरुष एक महिला आणि तीन महिन्याच्या बाळाचा समावेश आहे. रेल्वे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी रात्रीच्या सुमारास विरार रेल्वे स्थानकात प्लॅटफॉर्मवर लागलेल्या ट्रेन मधून विरुद्ध दिशेने उतरून हे कुटुंब रेल्वे रूळ ओलांडत होते. यावेळी वेगात येणाऱ्या मेलने तिघांना जोरदार धडक दिली. या धडकेत अख्ख कुटुंबच संपलं.

समृद्धी महामार्गावर पुन्हा अपघात

शुक्रवारी सकाळी समृद्धी महामार्गावर बुलढाण्यात एसटी बसचा भीषण अपघात झाला आहे. रेती वाहून नेणाऱ्या टीप्परची धडक बसल्याने हा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात एसटीमधून प्रवास करणारे 17  प्रवासी जखमी झाले आहेत.  बुलढाण्यातील शेगाववरून मेहकरकडे येणाऱ्या एसटी महामंडळाच्य बसला टीप्पर चालकाने जोरदार धडक दिली. मेहकरजवळील समृध्दी महामार्गाच्या पुलाजवळ हा अपघात झाला. एसटी महामंडळाची बस मेहकरच्या दिशेने येत होती. त्यावेळी महामार्गावरील पुलाजवळ टिप्परने अचानक टर्न घेतल्याने एसटी आणि टिप्परची समोरासमोर धडक झाली.