भाजपची साथ सोडून आमच्या सोबत या; प्रकाश आंबेडकर यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना खुली ऑफर

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे लवकरच दिल्ली दौऱ्यावर जाणार आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील त्यांच्यासोबत दिल्लीला जातील, अशी माहिती सूत्रांनी दिलीय.

Updated: Jan 30, 2024, 07:32 PM IST
भाजपची साथ सोडून आमच्या सोबत या; प्रकाश आंबेडकर यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना खुली ऑफर title=

Maharashtra Political News :  मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना थेट वंचित बहुजन आघाडीनेच ऑफर दिली आहे. भाजपची साथ सोडून वंचितसोबत येण्याची ऑफर प्रकाश आंबेडकरांनी दिली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीआधी एकनाथ शिंदे वंचितची ही ऑफर स्वीकारणार का याची आता चर्चा सुरु झाली आहे.

प्रकाश आंबेडकर यांचा काँग्रेस विरोधातच प्रचार

मविआसोबत जाण्याची चर्चा सुरू असतानाच वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेस विरोधातच प्रचार सुरू केल्याची चर्चा रंगली आहे. वाशिममधल्या मुस्लीम संवाद यात्रेतल्या सभेत प्रकाश आंबेडकरांचा काँग्रेसविरोधी सूर होता. एकाच पक्षामागे धावू नका असा सल्ला देताना आंबेडकरांनी काँग्रेसवर टीका केली. 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंबद्दल सहानुभूती 

मराठा समाजाला ओबीसींच्या सवलती दिल्याचा फायदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना स्पष्टपणे होईल तर ओबीसींना जवळ घेणा-या भाजपचं मात्र नुकसान होईल असा अंदाज वंचित बहुजनचे प्रमुख प्रकाश आंबेडकरांनी वर्तवलाय. मराठा कार्यकर्त्यांमध्ये एकनाथ शिंदेंबद्दल सहानुभूती तर भाजपबद्दल चीड असल्याचंही आंबेडकरांनी म्हंटलंय. 

प्रकाश आंबेडकर यांची अकोला लोकसभेत मोर्चे बांधणी

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर अकोला लोकसभेत मोर्चे बांधणी करत आहेत.आंबेडकरांनी रिसोड तालुक्यातील बेलखेडा, कवठा, सवड या गावांमध्ये सभा घेतल्या मुस्लिम युवकांशी संवाद साधला. अकोला प्रकाश आंबेडकरांची पारंपारिक जागा आहे. आता महाविकास आघाडीही या जागेसाठी आग्रही असल्याचं समजतंय.

लोकसभेसाठी वंचित बहुजन आघाडीचे 42 उमेदवार ठरले

लोकसभेसाठी वंचित बहुजन आघाडीचे 42 उमेदवार ठरले असून महा विकास आघाडीने सोबत घेतले तर त्यांच्या सोबत लढू अन्यथा स्वतंत्र लढू असा इशारा आंबेडकर यांनी दिला होता

वंचितला महाविकास आघाडीमध्ये समावेश

वंचितला महाविकास आघाडीमध्ये समावेश करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. आजच्या ट्रायडंटमध्ये झालेल्या बैठकीत शिवसेना ठाकरे गट, काँग्रेस आणि राष्ट्रवादी पवार गटाचे एकमत झालंय. तसं पत्र मविआ आघाडीनं वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांना लिहिलंय. मात्र असं पत्र अजून आपल्याला मिळालं नाही, अशी प्रतिक्रिया प्रकाश आंबेडकरांनी दिलीय. दरम्यान जागावाटपावरही आजच्या मविआच्या बैठकीत चर्चा झाली. मराठावाड्यातलं लोकसभेचं जागावाटप जवळपास निश्चित झाल्याची माहिती सूत्रांनी दिलीये..२ फेब्रूवारीला मविआची पुन्हा एकदा बैठक होणार आहे.