LIC मध्ये नोकरी आणि कॉम्प्युटर हाताळता येण्याची अट; 35 हजारहून अधिक मिळेल पगार

LIC HFL Recruitment 2024: एलआयसी हाऊसिंग फायनान्स लिमिटेड अंतर्गत विविध राज्यांमध्ये ज्यूनिअर असिस्टंट पदाची भरती केली जाणार आहे.

Pravin Dabholkar | Updated: Jul 28, 2024, 01:02 PM IST
LIC मध्ये नोकरी आणि कॉम्प्युटर हाताळता येण्याची अट; 35 हजारहून अधिक मिळेल पगार  title=
एलआयसी अंतर्गत नोकरीची संधी

LIC HFL Recruitment 2024: एलआयसी ही देशातील नागरिकांचा विश्वास असलेली संस्था आहे. एलआयसीमध्ये नागरिक मोठ्या प्रमाणात यामध्ये गुंतवणूक करतात. त्यामुळे एलआयसीचा आवाका देशभरात पसरलाय. येथे तुम्ही कधी ना कधी नक्कीच गुंतवणूक केली असेल. पण तुम्हाला येथे नोकरीची संधी मिळाली तर? जीवन वीमा निगममध्ये नोकरीची इच्छा असलेल्या तरुणांसाठी नामी संधी चालून आली आहे. येथील भरतीसाठी कॉम्प्युटर हाताळता येणे ही महत्वाची अट आहे. एलआयसी हाऊसिंग फायनान्स लिमिटेड अंतर्गत विविध राज्यांमध्ये ज्यूनिअर असिस्टंट पदाची भरती केली जाणार आहे. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अर्जाची शेवटची तारीख, पगार याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. 

पात्रता

एलआयसी एचएफल अंतर्गत ज्युनिअर असिस्टंटच्या एकूण 200 हून अधिक रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. यामध्ये सर्वाधिक 53 जागा या महाराष्ट्रातून भरल्या जाणार आहेत. या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे किमान वय 21 वर्षे तर कमाल वय 28 वर्षे इतके आहे. ज्युनिअर असिस्टंट पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी असणे आवश्यक आहे. पदवीमध्ये 60 टक्क्यांपेक्षा जास्त गुण असावेत. यासोबतच उमेदवारांना कॉम्प्युटर सिस्टिम हाताळता येणे आवश्यक आहे. 

अर्ज शुल्क

एलआयसी एचएफएल भरती 2024 मध्ये ज्युनिअर असिस्टंट पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडून 800 रुपये अर्ज शुल्क घेतले जाईल. सोबत 18 टक्के जीएसटी रक्कमही भरावी लागेल.सर्व उमेदवारांना हे शुल्क भरावे लागेल. यात कोणाला सवलत नसेल. तसेच एकदा भरलेली अर्जाची रक्कम कोणत्याही कारणास्तवर परत केली जाणार नाही, याची नोंद घ्या. 

पगार

ज्युनिअर असिस्टंट पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराची निवड ऑनलाईन परीक्षा, मुलाखत या माध्यमातून केली जाणार आहे. या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना 35 हजार रुपयांपर्यंत पगार दिला जाणार आहे. अर्ज करण्यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवार अधिकृत वेबसाइट lichousing.com  वर जाऊन आपला अर्ज करु शकतात. अर्ज करण्यापुर्वी  उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अर्जात काही त्रुटी असल्यास, दिलेल्या मुदतीनंतर आल्यास अर्ज बाद करण्यात येईल, याची नोंद घ्या.

पदभरतीचे नोटिफिकेशन पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाइटवर जाण्यासाठी येथे क्लिक करा

इंडिया-तिबेट पोलीस कॉंस्टेबल भरती

इंडिया-तिबेट पोलीस कॉंस्टेबल भरती 2024 साठी तुम्ही ऑनलाईन माध्यमातून अर्ज करु शकता. यासाठी 28 जुलै 2024 रोजी अर्ज प्रक्रिया सुरु झाली आहे. या पदभरती अंतर्गत एकूण 143 कॉन्स्टेबलची रिक्त पदे भरली जाणार आहेत. आयटीबीपीमध्ये स्वच्छता कर्मचारी, मोची आणि न्हावी या रिक्त पदांच्या भरतीसाठी नोटिफिकेशन काढण्यात आले आहे. यात स्वच्छता कर्मचाऱ्याची एकण 101 पदे, कॉन्स्टेबल (न्हावी)ची एकूण 5 पदे आणि कॉन्स्टेबल (माळी) ची एकूण 37 रिक्त पदे भरली जणार आहेत. स्वच्छता कर्मचारी आणि न्हावी या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे किमान वय 18 वर्षे आणि कमाल वय 25 वर्षे इतके असणे आवश्यक आहे.कॉन्स्टेबल माळी पदासाठी वयोमर्यादा 18 ते 23 वर्षे इतकी आहे.  कोणत्याही मान्यताप्राप्त शिक्षणसंस्थेतून तुम्ही किमान दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.3 चाचण्यांच्या माध्यमातून तुमची या रिक्त पदांसाठी निवड केली जाणार आहे.यामध्ये शारिरीक परीक्षा, लेखी परीक्षा आणि ट्रेड टेस्टचा समावेश असेल. यासोबतच उमेदवारांकडे संबंधित ट्रेडमधील आयटीआय प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. यासोबतच उमेदवाराने संबंधित ट्रेडमधील आयटीआयमधून 2 वर्षांचा डिप्लोमा करणे आवश्यक आहे. 26 ऑगस्ट 2024 ही अर्जाची शेवटची तारीख आहे.