जीवन प्राधिकरणाच्या कार्यालयात दारूची पार्टी, व्हीडिओ व्हायरल....

जीवन प्राधिकरणाच्या (Maharashtra Jeevan Pradhikaran)  कार्यालयात चक्क दारुची पार्टी (Liqour Party In Office) रंगली आहे.

Updated: Aug 5, 2021, 10:25 PM IST
जीवन प्राधिकरणाच्या कार्यालयात दारूची पार्टी, व्हीडिओ व्हायरल....  title=

जळगाव : शासकीय कार्यालयात (Governmenrt Office) कर्मचारी अनेकदा सर्रासपणे मनाजोगे वावरतात. आपण कुठे आहोत, काय करतोय, याचा त्यांना विसर पडतो. जळगावात या प्रकाराचा प्रत्यय आला. जळगावातील जीवन प्राधिकरणाच्या (Maharashtra Jeevan Pradhikaran)  कार्यालयात चक्क दारुची पार्टी (Liqour Party In Office) रंगली आहे. या सर्व प्रकाराचा व्हीडिओ व्हायरल झाला. त्यानंतर सर्व प्रकार उजेडात आला आहे. कार्यालयात ऑन ड्युटी असा प्रताप करणाऱ्या कर्मचाऱ्यांचं निलंबन करावं, अशी मागणी आता स्थानिकांकडून करण्यात येत आहे. (Liquor party at Jeevan Pradhikaran office in Jalgaon video goes viral)
   
नक्की काय झालं?

जळगावात जीवन प्राधिकरणाच्या कार्यालयात दारूची पार्टी रंगली. जळगाव येथील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे जळगाव, धुळे आणि नंदूरबार जिल्ह्याचे विभागीय कार्यालय आहे. विशेष म्हणजे या कार्यालयाचे नुकतेच जळगावात उद्घाटन करण्यात आले होते. या प्राधिकरणाच्या कार्यालयात दारूची पार्टी झाली. त्याचा व्हिडीओ वायरल झाल्याने खळबळ उडाली आहे. या घटनेवरुन आता संताप व्यक्त होतोय. त्यामुळे आता या व्हीडिओनंतर या कर्मचाऱ्यांवर कारवाई होणार का, याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे.