Pune Gangster List : पुण्यातील 200 ते 300 गुंड आज एकाचवेळी पोलिस ठाण्यात हजर झाले. पोलिसांनी या गुंडांची परेड काढून त्यांना चांगलाच दम भरला यामुळे सर्वचं गुंडांचे धाबे दणाणले आहेत. पुण्यात वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी तसेच पोलिसांचा वचक दाखवण्यासाठी सर्व गुंडांना एकाचवेळी पोलिस ठाण्यात बोलवण्यात आले. कोण आहेत पुण्यातील टॉप टेन गुंड जाणून घेवूया.
विरोधकांनी सत्ताधा-यांवर गुंडांशी साटलोटं असल्याचा आरोप झाल्यानंतर पुण्याचे नवनियुक्त पोलीस आयुक्त अमितेश कुमार अॅक्शन मोडवर आले आहेत. पुणे आयुक्तांनी गुंडांना चांगलाच दणका दिलाय. पुण्यातल्या पोलीस आयुक्तांनी गजानन मारणे, नीलेश घायवळ, बाबा बोडके, बंडू आंदेकर, टिपू पठाण, कंचीले अशा प्रमुख गुन्हेगारांसह 50 टोळ्यांमधल्या सुमारे 267 सराईत गुन्हेगारांना परेडसाठी पोलीस आयुक्तालयात हजेरीसाठी बोलावलं होतं. सर्व गुंडांना सोशल मीडियावर रील न टाकण्याची तंबी पोलिस आयुक्तांनी दिली. शहरातील सर्व गुन्हेगारी टोळ्यांतील सराईत गुन्हेगारांची परेड गुन्हेगारी कृत्य या गुन्हेगारकडून घडणार नाही म्हणून आज 267 गुन्हेगारांना बोलावण्यात आले.
कोणताही गुन्हा करायचा नाही. गुन्हेगारीस प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष पाठिंबा द्यायचा नाही. बेकायदेशीर कृत्यात सहभागी व्हायचे नाही, सोशल मीडियावर व्हिडिओ किंवा रील्स टाकायच्या नाहीत. राहण्याचा पत्ता किंवा मोबाईल बदलल्यास तो क्रमांक बदलल्याची माहिती पोलिस ठाण्यात किंवा गुन्हे शाखेच्या युनिटला हजर राहून कळवावी, अन्यथा गुन्हा दाखल करण्यात येईल, असा इशारा पोलिसांना दिला आहे.
1 गजा मारणे, मुळशी पॅटर्न चा प्रॉडक्ट
गजा मारणे हा पुण्यातील कुख्यात गुंड आहे. खून, खुनाचा प्रयत्न, अपहरण, खंडणी, जमीन बळकावणे असे गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत. गजा मारणे आर्थर रोड तुरुंगातून जामिनावर सुटल्यानंतर त्याच्या समर्थकांनी भव्य रॅली काढली होती.
2 निलेश घायवळ
निलेश घायवळ हा गजा मारणेचा एकेकाळचा विश्वासू साथीदार आहे. नंतर दोघे एकमेकांचे वैरी झाले. खून, खंडणी असे अनेक गंभीर गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत.
3 सचिन पोटे
सचिन पोटे हा नवी पेठेतील गुंड आहेय अनेक गंभीर गुन्ह्यातील तो प्रमुख आरोपी आहे. मुंढव्यातील पब मध्ये त्याने गोळीबार केला होता. त्यांनतर त्याच्यावर मोक्काची कारवाई झाली होती.
4) बाबा बोडके
बाबा बोडके हा अरुण गवळी टोळीतील गुंड भाई प्रदीप सोनवणे खुनातील आरोपी आहे. त्याच्यावर हत्या, खंडणी सह अनेक गंभीर गुन्हे दाकल आहेत. मात्र,
पुवाव्या अभावी त्याची मुक्तता झाली. 1995 पासून गुन्हेगारी जगतात त्याची दहशत आहे. मोक्काखाली त्याला अटक झाली होती.
5) बंडू आंदेकर
बंडू आंदेकर याच्यावर खून, खुनाचा प्रयत्न, मारामारी असे अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. मागील वर्षी गणेश पेठेत टोळीयुद्धातून एकाचा खून झाला होता. या खुनात त्याचा सहभाग होता. त्याच्यावर देखील मोक्काची कारवाई झाली. मात्र, तो जामिनावर बाहेर आला. बंडू आंदेकर यांची राजकीय पार्श्वभूमी देखील आहे.