Barsu Refinery Project Updates : कोकणात आज बारसू रिफायनरी प्रकल्पावरून राजकीय धुमशान पाहायला मिळेल. रिफायनरी विरोधकांची भेट घेण्यासाठी उद्धव ठाकरे बारसूकडे रवाना झाले आहेत. ठाकरे गटाने उद्धव ठाकरेंच्या दौ-यासाठी जोरदार तयारी केलीय. तर बारसूच्या समर्थनार्थ नारायण राणेही महामोर्चा काढणार आहेत. यात राणेंसोबत उद्योगमंत्री उदय सामंत आणि राणेंचे दोन्ही पुत्र सहभागी होतील.तेव्हा बारसूत ठाकरे आणि राणे आमनेसामने उभे ठाकलेले पाहायला मिळतील.कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून प्रचंड पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय.
6 May 2023, 08:59 वाजता
नारायण राणे, उदय सामंत मोर्चाला येण्याची शक्यता कमी
Barsu Refinery Project Updates : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे दोन ठिकाणी बारसू रिफायनरी प्रकल्प विरोधकांना भेटणार देणार आहेत. त्याचेवळी भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि उद्योगमंत्री उदय सामंत हे मोर्चाला येण्याची शक्यता कमी आहे. राजापूर येथील समर्थनार्थ मोर्च्याला येण्याची शक्यता कमी आहे. कारण उदय सामंत सध्या कर्नाटक प्रचार दौऱ्यावर बंगळुरुमध्ये आहेत.
6 May 2023, 08:54 वाजता
बारसू येथे कडक पोलीस बंदोबस्त
Tight Police security in Barsu : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे महामोर्चा काढणार असल्याचे बारसू प्रकल्प ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे.
6 May 2023, 08:52 वाजता
उद्धव ठाकरे दोन ठिकाणी बारसूत विरोधकांना भेटणार
Uddhav Thackeray Barsu Visit : उद्धव ठाकरे दोन ठिकाणी बारसू रिफायनरी प्रकल्प विरोधकांना भेट देणार आहेत. राजापूर तालुक्यातील सोलगाव फाट्यावर आणि गिरमादेवी परिसरात उद्धव ठाकरे विरोधकांना भेटणार आहेत. सोलगाव फाट्यावर देवाचे गोठणे, गोवीळ या ठिकाणच्या विरोधकांशी संवाद साधतील. तर गिरमादेवी कोंड या ठिकाणी बारसू आणि परिसरतातील विरोधकांची भेट घेतील.
6 May 2023, 08:50 वाजता
उद्धव ठाकरे बारसूकडे रवाना
Uddhav Thackeray : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे मुंबईहून कोकणातील बारसूकडे रवाना झाले आहेत.
6 May 2023, 08:39 वाजता
'लोकांना विश्वासात घेतलं पाहिजे, ठाकरे हे लोकांना समजून घेणार'
Sachin Ahir on Barsu Refinery Project : बारसू रिफायनरी प्रकल्पाबाबत ठाकरे गटाचे नेते सचिन आहिर यांनी आपली बाजू मांडली आहे. आजचा दिवस महत्वाचा आहे. रोजगार जारी असला तरी ती जागा कोणाची आहे, याला विश्वासात घेतलं पाहिजे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे बारसूला जात आहेत, आणि लोकांना समजून घेणार आहेत. नारायण राणे. शासनात जे प्रतिनिधी आहेत ते ऐकण्याच्या भूमिकेत नाहीत. कायदा आणि सुव्यवस्था टीकावी यासाठी प्रयत्न केले पाहिजे. हे मित्र पक्षातील लोकांनी लक्षात घेतलं पाहिजे. राज्य सरकारची जबाबदारी आहे. आम्ही ती जबाबदारी प्रयत्न करत आहोत. आम्ही सभा करणार होतो पण पारवानगी नाकारली.
6 May 2023, 08:37 वाजता
वैभव नाईक यांचे राणे यांना थेट आव्हान
Vaibhav Naik on Narayan Rane : नारायण राणे यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना अडवून दाखवावं असं आव्हान वैभव नाईक यांनी राणेंना दिले आहे. उद्धव ठाकरे आज बारसूमध्ये येतायत म्हणून राणे आज मोर्चा काढणार आहेत. त्यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी प्रकल्पग्रस्तांशी भेटून चर्चा करावी. मात्र, ते तसं करत नाहीत, कारण ते त्यांना हाकलून देतील, अशी टीका नाईकांनी राणे यांच्यावर केली आहे.
6 May 2023, 08:35 वाजता
राज ठाकरे यांची रत्नागिरीत सभा
Raj Thackeray's Sabha in Ratnagiri : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज रत्नागिरीत सभा होते आहे. या सभेत ते कुणावर निशाणा साधणार याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे. बारसू प्रकल्पाविरोधात मनसेही आपली भूमिका मांडली आहे. प्रदूषणकारी प्रकल्प कोकणात नको, असे मनसेकडून सांगण्यात आले होते. आजच उद्धव ठाकरेही कोकणात आहेत. त्यांचा बारसूत दौरा असून, राज ठाकरे रिफायनरीबद्दल काय बोलणार याचीच उत्सुकता सगळ्यांना लागली आहे.
6 May 2023, 08:32 वाजता
उद्धव ठाकरे, नारायण राणे आज बारसूत
Barsu Refinery Project : कोकणातील राजापूर तालुक्यातील बारसू येथे प्रस्ताविस्त रिफायनरी प्रकल्पाला स्थानिकांनी तीव्र विरोध केला आहे. तर बारसू रिफायनरी प्रकल्पावरुन राजकीय धुमशान पाहायला मिळणार आहे. रिफायनरी विरोधकांची भेट घेण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज बारसूत जाणार आहेत. ठाकरे गटाने त्यासाठी जोरदार तयारी केली आहे. दरम्यान, त्यांच्या सभेला जिल्हा प्रशासनाने परवानगी नाकारली आहे. तर केंद्रीय मंत्री नारायण राणे हे मोर्चा काढणार आहे. त्यामुळे येथील वातावरण चांगलेच तापणार आहे.
कोकणात बारसू प्रकल्प नको, अशी येथील जनतेची मागणी आहे. राजापूर तालुक्यातील बारसू, सोलगाव परिसरातील स्थानिक नागरिकांनी बारसू रिफायनरी प्रकल्पाच्या सर्वेक्षणाला तीव्र विरोध केला होता. यावेळी त्यांनी तीन दिवस आंदोलन केले. दरम्यान, आंदोलनकांवर पोलिसांनी बळाचा वापर केला. तर अश्रुधुराच्या नळकांड्याही फोडण्यात आल्या होत्या. त्यामुळे हे आंदोलन चिघळले होते. पोलिसांनी धरपकड करत आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केला. काही लोकांना ताब्यात घेतले होते. तर काही आंदोलक नेत्यांना अटक केली होती. त्यामुळे या आंदोलनात ठाकरे गटाने उडी घेतली आहे. लोकांशी चर्चा करा. त्यांना समजून सांगा. केवळ लाठ्याकाट्याच्या जोरावर आणि पोलिसी बळावर हा प्रकल्प लादू नये, अशी भूमिका ठाकरे यांनी घेतली आहे.