Maharashtra Ganesh Chaturthi Celebration Live Updates : विघ्नहर्ताची मनोभावे पूजा केल्यास सर्व समस्यादूर होतात. तसेच गणपती बाप्पाला प्रिय असलेले मोदक , लाल फुल आणि दुर्वा अर्पण केल्यास सर्व मनोकामना पूर्ण होतात. सर्वत्र वातावारण बाप्पामय झालं आहे. कोकणाचं आराध्य दैवत गणेशाचं वाजत गाजत आणि पारंपरिक पद्धतीने आगमन होतंय. मुंबईतील लालबागचा राजा आणि पुण्यातील दगडूशेठ गणपती मंदिरात भक्तांची रीघ लागली आहे.
7 Sep 2024, 18:27 वाजता
गणेश उत्सवाला सुरुवात झाली आहे. वारंवार मागणी करून देखील कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील रस्त्यावरील खड्डे बुजवले गेले नाहीत. या खड्ड्यातून गणरायाचे आगमन झाले. मनसेकडून कल्याणमध्ये आज अनोखे आंदोलन करण्यात आले. गणेशाची वेशभूषा धारण करून गणेश खड्डे रस्त्यावर अवतरले. त्यांनी खड्ड्यातच ठाण मांडले. यावेळी मनसे कार्यकर्त्यांनी मालवणी भाषेत देवा महाराजा हे गाऱ्हाणे घातले.
7 Sep 2024, 17:27 वाजता
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या घरी गणरायाचं आगमन झालंय. मुख्यमंत्र्यांचं वर्षा या निवासस्थानी गणरायाचं आगमन झालं. यावेळी कुटुंबीयासोबत मुख्यमंत्र्यांनी गणराजयांची मनोभावे पूजा करून दर्शन घेतलं. सर्वांच्या जीवनात सुख-समृद्धी येवो, असं साकडं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी गणरायाकडं घातलंय. यावेळी त्यांनी राज्यातील नागरिकांना गणेश चतुर्थीच्या शुभेच्छाही दिल्या.
7 Sep 2024, 16:21 वाजता
शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी मागील चार दिवसापासून सिंदखेडराजा येथे संपूर्ण कर्जमाफी,पीक विमा, सोयाबीन,कापूस दरवाढ मिळावी या करिता अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे, आज आंदोलनचा चौथा दिवस असून रविकांत तुपकर यांची तब्येत खालावल्याने तुपकर यांचे समर्थक कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झालेत, हिंगोली जिल्ह्यांतील तुपकर यांच्या समर्थक शेतकऱ्यांनी नांदेड-वाशिम राष्ट्रीय महामार्ग कन्हेरगाव (नाका) येथे अडवून टायर जाळून आंदोलन सुरू केलंय,
7 Sep 2024, 15:27 वाजता
Breaking News : कुर्ला पूर्व रेल्वे स्थानकाजवळच्या सबेरा इमारतीला आग
शनिवारी कुर्ला पूर्व रेल्वे स्थानकाजवळील सबेरा इमारतीला आग लागली होती. मात्र अग्निशमन दलाच्या 8 गाड्यांना ही आग विझरवण्यात आली आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.
7 Sep 2024, 14:05 वाजता
हे सरकार जावं म्हणून जनतेने बाप्पा चरणी प्रार्थना केली असेल - जयंत पाटील
आज घरोघरी गणरायाचं आगमन होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. जयंत पाटील बोलताना म्हटले की, "दरवर्षी प्रमाणे यंदाही गणपती बाप्पांचं थाटात स्वागत झाले आहे, नोव्हेंबर महिन्यामध्ये नवं सरकार यावं. हे सरकार जाऊन महा विकास आघाडीचे सरकार यावं. हे सरकार जावं म्हणून जनतेने बाप्पा चरणी प्रार्थना केली असेल".
7 Sep 2024, 13:55 वाजता
Pune Ganpati : पुण्यातील मानाचा गणपती श्री गुरुजी तालीम मंडळाच्या मिरवणुकीला सुरुवात
पुण्यातील तिसरा मनाचा गणपती असलेल्या श्री गुरुजी तालीम मंडळाच्या मिरवणुकीला सुरुवात झाली आहे. यंदा फुलांनी सजवलेल्या रथातून ही मिरवणूक काढण्यात आली असून यंदा गजमहालात बाप्पा विराजमान होणार आहेत. पुनीत बालन आणि जान्हवी धरीवाल यांच्या हस्ते गणपतीची प्राणप्रतिष्ठा होईल. मानाच्या तिसऱ्या गणपतीच्या आगमन मिरवणुकीत शिखंडी ढोल पथक सहभागी झाले आहे.
7 Sep 2024, 12:34 वाजता
Maharashtra Ganesh Chaturthi Celebration Live Updates : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या घरी गणरायाचं आगमन झालंय. मुख्यमंत्र्यांचं वर्षा या निवासस्थानी गणरायाचं आगमन झालं. यावेळी कुटुंबीयासोबत मुख्यमंत्र्यांनी गणराजयांची मनोभावे पूजा करून दर्शन घेतलं. सर्वांच्या जीवनात सुख-समृद्धी येवो, असं साकडं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी गणरायाकडं घातलंय. यावेळी त्यांनी राज्यातील नागरिकांना गणेश चतुर्थीच्या शुभेच्छाही दिल्या.
वर्षा निवासस्थान, मुंबई
वर्षा निवासस्थानी श्री गणेश प्राणप्रतिष्ठा व पूजन - लाईव्ह https://t.co/nPgZL8ZO54
— Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) September 7, 2024
7 Sep 2024, 12:33 वाजता
Maharashtra Ganesh Chaturthi Celebration Live Updates : राज्यासह देशभरात विघ्नहर्ता लाडक्या बाप्पाचं आज आगमन होत आहे. सर्वसामान्यांपासून ते सेलिब्रिटी आणि राजकीय नेत्यांच्या घरीही गणरायाचे आगमन व्हायला सुरुवात झाली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 'सागर' या शासकीय निवासस्थानी बाप्पाची प्रतिष्ठापणा करण्यात आलीय. यावेळी देवेंद्र फडणवीस यांच्यासह कुटुंबीय उपस्थित आहेत.
सागर निवासस्थान, मुंबई.
LIVE | श्री गणेशमूर्तीची प्राणप्रतिष्ठा#Maharashtra #Mumbai #GaneshChaturthi https://t.co/CT2MN3upx2
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) September 7, 2024
7 Sep 2024, 12:28 वाजता
Maharashtra Ganesh Chaturthi Celebration Live Updates : सर्वत्र गणेशाचे आगमन मोठ्या थाटामाटात होत आहे.. कोल्हापुरात देखील हाच उत्साह पाहायला मिळत असून छत्रपती घराण्याचा गणपती देखील नवीन राजवाड्यावर दाखल होत आहे. सध्या राजवाड्यावरचा हा गणपती नवीन राजवाड्यावर दाखल होत आहे.. नूतन खासदार शाहू महाराज छत्रपती आणि इतर सदस्य गणेशाचे स्वागत करून आत्त मध्ये गणेश मूर्ती घेणार आहेत.
7 Sep 2024, 10:47 वाजता
Maharashtra Ganesh Chaturthi Celebration Live Updates : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या घरी बाप्पाच आगमन झालंय. सहकुटुंब त्यांनी गणेशाची प्राणप्रतिष्ठापना केली.