Ganesh Chaturthi 2024 Live Updates : कल्याणमध्ये मनसेचे अनोखे आंदोलन

Ganesh Chaturthi Celebration Live Updates : महाराष्ट्रासह देशभरात गणेशोत्सव मोठ्या आनंदात आणि जल्लोत साजरा केला जातो. हिंदू धर्माच गणेश चतुर्थीला खुप महत्व आहे. कोणत्याही शुभ कार्याची सुरूवात ही गणेश पूजनाने केली जाते. गणेश चतुर्थीचा आनंद द्विगुणित करण्यासाठी प्रत्येक अपडेट पाहा एका क्लिकवर 

Ganesh Chaturthi 2024 Live Updates : कल्याणमध्ये मनसेचे अनोखे आंदोलन

Maharashtra Ganesh Chaturthi Celebration Live Updates : विघ्नहर्ताची मनोभावे पूजा केल्यास सर्व समस्यादूर होतात. तसेच गणपती बाप्पाला प्रिय असलेले मोदक , लाल फुल आणि दुर्वा अर्पण केल्यास सर्व मनोकामना पूर्ण होतात. सर्वत्र वातावारण बाप्पामय झालं आहे. कोकणाचं आराध्य दैवत गणेशाचं वाजत गाजत आणि पारंपरिक पद्धतीने आगमन होतंय. मुंबईतील लालबागचा राजा आणि पुण्यातील दगडूशेठ गणपती मंदिरात भक्तांची रीघ लागली आहे. 

7 Sep 2024, 10:19 वाजता

Maharashtra Ganesh Chaturthi Celebration Live Updates :  कोकणात गणेशोत्सवाचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. कोकणातल्या ग्रामीण भागात गणरायाला आपल्या डोक्यावरून घरी आणण्याची परंपरा आहे. भाताच्या हिगव्यागार शेतातून डोक्यावरून गणपती घरी आणले जातात. कोकणातल्या अनेक खेडेगावात ही परंपरा आजही गणेशोत्सवात कायम आहे. रत्नागिरी तालुक्यातील नाणीज गावातले हे विलोभनीय दृष्य गणेशभक्तांचं लक्ष वेधून घेत आहे. ढोल ताशांच्या गजरात लाडक्या बाप्पाचे घरोघरी आगमन झालं. भाद्रपद चतुर्थीच्या दिवशी कोकणात गणराय विराजमान होतात.

7 Sep 2024, 10:17 वाजता

Maharashtra Ganesh Chaturthi Celebration Live Updates :  विघ्नहर (ओझर) हे पुणे जिल्ह्यातील गणपतीचे देऊळ आहे. हे देऊळ अष्टविनायकांपैकी एक आहे. अष्टविनायकातला सातवा गणपती म्हणजे ओझरचा विघ्नहर. या गणपतीला विघ्नेश्र्वर म्हणूनही ओळखले जाते. विघ्न म्हणजे कार्यात बाधा येणारी बाधा आणि हर म्हणजे दूर करणारा.ओझर मधील श्री विघ्नहर हा अष्टविनायकापैकी सर्वात श्रीमंत गणपती आहे. ओझर हे गाव कुकडी नदीवर वसलेले आहे. 

7 Sep 2024, 10:12 वाजता

Ganesh Chaturthi 2024 LIVE Updates : पुण्यामध्ये बाप्पांच्या आगमनाची सुरुवात झालीय. अनेक गणपतीच्या मिरवणुका निघत असून... ढोल पथकांचं वादन सुरू आहे. त्यामुळे भक्तिमय आणि उत्साहाचं वातावरण सध्या पुण्यात पाहायला मिळतंय. मिरवणुकीसमोर वेगळेवेगळे वादन, नृत्य, आणि लाठी-काठीचं प्रात्यक्षिकं सादर केलं जातंय. 

7 Sep 2024, 09:52 वाजता

Maharashtra Ganesh Chaturthi Celebration Live Updates :  नागपूरकरांचे आराध्य दैवत अन् दिग्गजांचे श्रद्धास्थान असलेल्या टेकडी गणपती

नागपुरातील टेकडी गणपती मंदिर हे प्राचीन आहे. तसंच, या ठिकाणी असलेल्या गणपतीची मूर्ती ही स्वयंभू आहे. दहा दिवस चालणाऱ्या गणेशोत्सवासाठी येथे आकर्षक रोषणाई केली. याशिवाय स्वयंभू मूर्तीच्या दर्शनासाठी भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी पाहिला मिळत आहे. पूर्वीच्या काळात भोसले राजघराण्यातील मंडळी नियमित येथे दर्शनाला येत होते. टेकडीच्या गणपतीचा ३५० वर्षे जुना इतिहास आहे. विदर्भातील अष्टविनायकांमध्ये पहिला मान टेकडी गणपतीला आहे.

7 Sep 2024, 09:46 वाजता

Maharashtra Ganesh Chaturthi Celebration Live Updates :  गणेशगल्ली, लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी

गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर गणेश भक्तांनी गणेशगल्ली, लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी गर्दी केल्याची पाहिला मिळत आहे. या बाप्पाच्या दर्शनासाठी देशविदेशातील लोक दरवर्षी मोठ्या संख्येने येत असतात. 

7 Sep 2024, 08:47 वाजता

Maharashtra Ganesh Chaturthi Celebration Live Updates : अकोल्यात हिंदू-मुस्लिम एकोप्याच उदाहरण पाहायला मिळतंय. शहरातील आगामी सण उत्सव लक्षात घेता अकोल्यात ऐतिहासिक असा निर्णय घेण्यात आलाय...यासाठी हिन्दू-मुस्लीम गठबंधन करण्यात आलं आहे.  गणेशोत्सव आणि ईद-ए मिलादुन्नबी समन्वय समिती गठीत करण्यात आली आहेय..

7 Sep 2024, 08:45 वाजता

Maharashtra Ganesh Chaturthi Celebration Live Updates : जळगावातील  सुवर्णनगरी सराफ बाजारात नागरिकांची मोठी गर्दी होत आहे...  बाप्पासाठी लागणारे चांदीचे आभूषण घेण्यासाठी  नागरिक चांगलीच गर्दी करतायेत... सराफ बाजारात चांदीचा मोदक, दूर्वा, मुकुट, गळ्यातील माळ, चांदीचं जास्वंदाचे फुल, पान, जानव अशा वेगवेगळ्या वस्तू विक्रीसाठी उपलब्ध आहेत..

7 Sep 2024, 08:44 वाजता

Maharashtra Ganesh Chaturthi Celebration Live Updates : मालेगावच्या सावता गणेश मंडळाच्या मानाच्या महागणपतीचं शहरात भव्य आगमन झालंय. 11 विविध सांस्कृतिक पथकानं 22 फूट मूर्तीच्या बाप्पाचं स्वागत केलं. टाळ-मृदुंगासह शिवकालीन मर्दानी खेळ, आदिवासी नृत्य, मनमाडचे ढोल पथक आदी पथक मिरवणुकीत सामील झाले.

7 Sep 2024, 08:43 वाजता

Maharashtra Ganesh Chaturthi Celebration Live Updates : दादरमध्ये  पेणच्या पर्यावरण पूरक गणपतीला मोठी मागणी होत असल्याची पहायला मिळत आहे..  पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी नागरिकांचा कल वळतोय..  गणेश मूर्ती ही पर्यावरण पूरक असली पाहिजे,  त्यासाठी शाडूच्या मातीची किंवा कागदाच्या लगद्यापासून बनवलेल्या गणेश मूर्ती घेऊन त्याची स्थापना केली जात आहे...  

7 Sep 2024, 08:41 वाजता

Ganesh Chaturthi 2024 LIVE Updates : लाडक्या बाप्पा घरोघरी विराजमान होणार आहे. अख्ख महाराष्ट्र गणेशमय झालंय. विघ्नहर्त्या 10 दिवस आपल्याकडे पाहुणा असणार आहे. त्यामुळे गणेशाची प्राणप्रतिष्ठापनेपासून शुभ मुहूर्त, पूजा विधी आणि साहित्य जाणून घ्या

बातमी सविस्तर वाचा - Ganesh Chaturthi 2024 : गणेशाची प्राणप्रतिष्ठापना करण्यासाठी फक्त काही तासांचा अवधी, शुभ मुहूर्त, पूजा साहित्य, विधीसह संपूर्ण माहिती एका क्लिकवर