Ganesh Chaturthi 2024 Live Updates : कल्याणमध्ये मनसेचे अनोखे आंदोलन

Ganesh Chaturthi Celebration Live Updates : महाराष्ट्रासह देशभरात गणेशोत्सव मोठ्या आनंदात आणि जल्लोत साजरा केला जातो. हिंदू धर्माच गणेश चतुर्थीला खुप महत्व आहे. कोणत्याही शुभ कार्याची सुरूवात ही गणेश पूजनाने केली जाते. गणेश चतुर्थीचा आनंद द्विगुणित करण्यासाठी प्रत्येक अपडेट पाहा एका क्लिकवर 

Ganesh Chaturthi 2024 Live Updates : कल्याणमध्ये मनसेचे अनोखे आंदोलन

Maharashtra Ganesh Chaturthi Celebration Live Updates : विघ्नहर्ताची मनोभावे पूजा केल्यास सर्व समस्यादूर होतात. तसेच गणपती बाप्पाला प्रिय असलेले मोदक , लाल फुल आणि दुर्वा अर्पण केल्यास सर्व मनोकामना पूर्ण होतात. सर्वत्र वातावारण बाप्पामय झालं आहे. कोकणाचं आराध्य दैवत गणेशाचं वाजत गाजत आणि पारंपरिक पद्धतीने आगमन होतंय. मुंबईतील लालबागचा राजा आणि पुण्यातील दगडूशेठ गणपती मंदिरात भक्तांची रीघ लागली आहे. 

7 Sep 2024, 08:37 वाजता

Maharashtra Ganesh Chaturthi Celebration Live Updates : नागपुरातील टेकडी गणेशाच्या दर्शनासाठी भाविकांची रीघ

नागपुरातील टेकडी गणेशाच्या दर्शनासाठी आज पहाटेपासूनच भाविकांची रीघ लागलीय.... नागपूर विदर्भातून भक्त नागपुरातील टेकडी गणपतीच्या दर्शनाला पोहोचत.....शेकडो भाविकांच्या उपस्थितीत पहाटे टेकडी गणेशाची विधिवत पूजा आणि आरती पार पडली....त्यानंतर आज दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय...

7 Sep 2024, 08:35 वाजता

Maharashtra Ganesh Chaturthi Celebration Live Updates : रत्नागिरीतील गणपती पुळ्याचा बाप्पाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी

रत्नागिरीतील गणपती पुळ्याचा बाप्पाच्या दर्शनासाठी देशाच्या कानाकोप-यातून गणेश भक्त गर्दी करत असतात... गणेश उत्सवामध्ये गणपतीपुळे पंचक्रोशीत एक गाव एक गणपती प्रथा आहे... त्यामुळे गणपती उत्सवाच्या पहिल्या दिवशीच  भाविकांसाठी गणपतीपुळ्यात गाभारा खुला करण्यात येतो.. वर्षातून एकदाच श्रींच पद स्पर्श करण्याची संधी भाविकांना मिळते,  त्यामुळे गावकरी पहाटेपासून या ठिकाणी गर्दी करतात..

7 Sep 2024, 08:23 वाजता

Uddhav Thackeray Shivsena Wish Ganesh Chaturthi: उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं गणरायाला गणेश चतुर्थीनिमित्त साकडं 

"विद्येची, बुद्धीची, ज्ञानाची देवता व चौसष्ट कलांचा अधिपती म्हणून श्रीगणेशाचे अनन्यसाधारण महत्त्व तर आहेच; पण दुःख दूर करणारा, संकटांपासून वाचवणारा, अरिष्ट दूर करणारा विघ्नहर्ता म्हणून भक्तांच्या मनात गणरायाचे म्हणून एक अढळ स्थान आहे. त्यामुळे देशातील व महाराष्ट्रातील शासनकर्त्यांनी जी संकटे महाराष्ट्रासमोर, देशासमोर व जनतेसमोर निर्माण करून ठेवली ती दूर करायची तर गणरायालाच प्रार्थना करावी लागेल," असं म्हणत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं गणरायाला गणेश चतुर्थीच्या दिवशीच 'सामना'च्या अग्रलेखातून साकडं घातलं आहे.

बातमी सविस्तर वाचा -  'गणनायका, शिंदे सरकारचे विघ्न कायमचे घालवण्यासाठी...'; ठाकरेंच्या शिवसेनेचं साकडं

7 Sep 2024, 08:20 वाजता

Ganesh Chaturthi 2024 LIVE Updates : पुण्यात श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची आगमन मिरवणूक थोड्याच वेळात 

जगभरातील गणेश भक्तांचं आकर्षण असलेल्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची आगमन मिरवणूक थोड्याच वेळात सुरू होणारेय.... साडेआठ वाजता गणरायाची मिरवणूक मूळ मंदिरापासून सुरू होईल आणि कोतवाल चावडी इथल्या उत्सव मंडपात विराजमान होईल. 11 वाजून 11 मिनिटांनी मूर्तीची प्रतिष्ठापना केली जाईल...दुपारी 12 वाजल्यानंतर भक्तांना दगडूशेठ बाप्पाच्या दर्शनाचा लाभ घेता येणारेय....यावर्षी मंडळाने जटोली इथल्या श्री शिव मंदिराची भव्य प्रतिकृती साकारलीये.... त्यावरील रोषणाईच संध्याकाळी 7 वाजता केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे.

7 Sep 2024, 08:12 वाजता

Ganesh Chaturthi 2024 LIVE Updates : पुण्यात गणरायाच वाजत गाजत आगमन

पुण्यामध्ये बाप्पांच्या आगमनाची सुरुवात झालीय. अनेक गणपतीच्या मिरवणुका निघत असून... ढोल पथकांचं वादन सुरू आहे. त्यामुळे भक्तिमय आणि उत्साहाचं वातावरण सध्या पुण्यात पाहायला मिळतंय. मिरवणुकीसमोर वेगळेवेगळे वादन, नृत्य, आणि लाठी-काठीचं प्रात्यक्षिकं सादर केलं जातंय.